‘भारत हिंदू राष्ट्रच, मी ािस्ती हिंदू’
By Admin | Updated: July 26, 2014 01:44 IST2014-07-26T01:44:02+5:302014-07-26T01:44:02+5:30
गोव्यातील मनोहर र्पीकर सरकारमधील मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्यांचे प्रकार सुरूच आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हिंदू राष्ट्र होईल,

‘भारत हिंदू राष्ट्रच, मी ािस्ती हिंदू’
पणजी : गोव्यातील मनोहर र्पीकर सरकारमधील मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्यांचे प्रकार सुरूच आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हिंदू राष्ट्र होईल, या मंत्री दीपक ढवळीकर यांच्या वक्तव्याचे अप्रत्यक्षपणो समर्थन करत उपमुख्यमंत्री अॅड. फ्रान्सिस डिसोझा यांनी भारत देश हिंदू राष्ट्र होते व आहे, असे सांगितले.
भारत म्हणजे हिंदुस्थान असून हिंदुस्थानात राहाणारा प्रत्येक जण हिंदूच असतो. आपण स्वत: ािस्ती हिंदू आहे, असे ते म्हणाले. हिंदू राष्ट्र म्हणून वेगळे काही निर्माण करण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे मंत्री ढवळीकर यांच्या गुरुवारच्या विधानावर विधिमंडळात तीव्र पडसाद उमटले. ढवळीकर यांनी त्यांच्या विधानाचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विरोधी पक्ष काँग्रेसने शुक्रवारी विधानसभेत करत सभात्याग केला. केंद्रात मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार आल्याने सरकारचे अभिनंदन करणारा ठराव गुरुवारी विधानसभेत मंजूर करण्यात आला. त्यावर बोलताना मंत्री ढवळीकर यांनी आम्ही सर्वानी जर मोदी यांना पाठिंबा दिला तर भारत हे हिंदू राष्ट्र बनेल व मोदी त्या दृष्टीने काम करतील, अशा अर्थाचे विधान केले. राष्ट्रीय स्तरावरही त्याबाबत प्रतिक्रिया उमटल्या. शुक्रवारी विधानसभा कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणो यांनी त्यावर जोरदार टीका केली. भारत, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीप्रधान देश आहे. घटनेचे रक्षण करण्याची शपथ मंत्र्यांनी घेतलेली असते, हे ढवळीकर विसरेल का, असा सवाल राणो यांनी केला. आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, दिगंबर कामत व अपक्ष आमदार विजय सरदेसाईही यांनी ढवळीकरांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. (खास प्रतिनिधी)
च्हिंदू शब्दास व्यापक आणि मोठा अर्थ आहे. हिंदू राष्ट्र असे म्हणताना दुस:या कोणत्याही धर्मातील व्यक्तींच्या भावना दुखावण्याचा मुळीच हेतू नव्हता व नाही, असे दीपक ढवळीकर यांनी सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर ‘लोकमत’ला सांगितले.
च्दुगरुणांचा नाश करण्याची इच्छा मोदी यांच्याकडे आहे. आम्ही त्यांना पाठिंबा दिला तर देशातील दहशतवाद व नक्षलवाद नष्ट होईल, असे ते म्हणाले. याच अर्थाने मी हिंदू राष्ट्र म्हटले होते. भारत हे हिंदू राष्ट्र आहे हे सर्वाना ठाऊक आहे, असेही त्यांनी सांगितले.