शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

जागतिक पासपोर्ट निर्देशांकात भारताने पटकावले ६६वे स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 06:59 IST

व्हिसामुक्त प्रवेशाला महत्त्व; सिंगापूर,जर्मनी ठरले अव्वल; अफगाणिस्तान सर्वांत शेवटच्या ९१व्या स्थानी

नवी दिल्ली : जागतिक पासपोर्ट निर्देशांकात भारतीयपासपोर्टने ६६वे स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतीय पासपोर्टने ९ स्थानांची प्रगती केली आहे. या निर्देशांकात सिंगापूर आणि जर्मनीचे पासपोर्ट सर्वाधिक शक्तिशाली ठरले आहेत.नागरिकत्व नियोजन क्षेत्रात काम करणाऱ्या ‘हेनले अँड पार्टनर्स’ या संस्थेने हा निर्देशांक जारी केला आहे. संबंधित देशाची पासपोर्टधारक व्यक्ती किती देशांत व्हिसाशिवाय जाऊ शकतात; अथवा त्या देशात गेल्यानंतर व्हिसा, भेट परवाना (व्हिजिटर्स परमिट) किंवा इलेक्ट्रॉनिक प्रवास अधिकार मिळवू शकतात, या निकषांच्या आधारे हा निर्देशांक तयार केला जातो.भारतीय पासपोर्टला ६६ देशांत मुक्त संपर्काधिकार (अ‍ॅक्सेस) आहे. सिंगापूर आणि जर्मनीच्या पासपोर्टचा मुक्त संपर्काधिकार तब्बल १६५ देशांत असल्याचे ‘हेनले अँड पार्टनर्स’ने जारी केलेल्या वार्षिक पासपोर्ट निर्देशांकात म्हटले आहे. केवळ २२ देशांत संपर्काधिकार असलेला अफगाणिस्तानचा पासपोर्ट सर्वांत शेवटच्या ९१व्या स्थानी आला आहे. २६ देशांच्या संपर्काधिकारासह पाकिस्तान शेवटून दुसऱ्या म्हणजेच ९0 व्या स्थानी आहे. २९ देशांच्या संपर्काधिकारासह सीरिया ८८व्या स्थानी, तर ३४ देशांच्या संपर्काधिकारासह सोमालिया ८७व्या स्थानी आहे.

असे ठरते मानांकनसूत्रांनी सांगितले की, पासपोर्ट निर्देशांक अलीकडे अत्यंत उपयुक्त आॅनलाइन साधन बनले आहे. याद्वारे जगातील पासपोर्टची स्थिती नागरिकांना कळते. पासपोर्टची छाननी करून जागतिक पातळीवरील मानांकनही त्याद्वारे दिले जाते.व्हिसामुक्त संपर्क अथवा आगमनानंतर व्हिसा (व्हिसा आॅन अरायव्हल) हे दोन निकषच त्यात प्रमुख आहेत. जेवढा पासपोर्ट शक्तिशाली तेवढा त्याचा व्हिसामुक्त संपर्क अधिक, असे साधे सूत्र यामागे आहे.

टॅग्स :passportपासपोर्टIndiaभारतsingaporeसिंगापूरGermanyजर्मनीAfghanistanअफगाणिस्तान