शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 06:20 IST

११ वर्षांच्या या काळात देशाने मोठी भरारी घेतली आहे.

चंद्रशेखर बर्वे

नवी दिल्ली :नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीची ११ वर्षे पूर्ण केली. योगायोग म्हणजे नुकतेच जपानला मागे टाकून भारत जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा झाली. ११ वर्षांच्या या काळात देशाने मोठी भरारी घेतली आहे.

नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतली होती. मोदी यांनी पंतप्रधानपदाच्या  कारकिर्दीत केवळ विक्रमाची नोंदच केली नाही तर अनेक विक्रमही मोडून काढले आहेत. धाडसी निर्णय आणि दृढनिश्चयाच्या स्वाभावामुळे देशात सामाजिक समता, आर्थिक चैतन्य, सांस्कृतिक पुनरुज्जीवन आणि पाकिस्तान-आधारित दहशतवादाला पायाखाली तुडविण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

देशाला स्वच्छतेची लावली सवय

पंतप्रधान मोदी यांनी २ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरू केलेली ‘भारत स्वच्छता मोहिम’ आता संरक्षण क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनविण्यापर्यंत येऊन पोहचली आहे.

मोदी सरकारने या काळात घेतलेले धडाकेबाज निर्णय

धोरणात्मक निर्णय :  ३७० कलम हटवणे, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा रद्द | तीन तलाक बंदी कायदा | सीएए लागू | जी-२०चे अध्यक्षपद भूषविले | महिला आरक्षण विधेयक | आयोध्येत भव्य राम मंदिराची उभारणी 

अर्थव्यवस्था व योजना : जनधन योजना | जीएसटी लागू | पीएम किसान योजना |  उज्ज्वला गॅस योजना | आयुष्यमान भारत योजना

सुरक्षा व संरक्षण : सर्जिकल स्ट्राईक (२०१६), एअर स्ट्राईक (२०१९), ऑपरेशन सिंदूर | भारतात संरक्षण साहित्याची निर्मिती वाढवणे | वन रँक वन पेन्शन

इन्फ्रास्ट्रक्चर व तंत्रज्ञान : डिजिटल इंडिया व मेक इन इंडिया | बुलेट ट्रेन प्रकल्पाची वेगाने निर्मिती सुरू | आत्मनिर्भर भारत मोहिम | यूपीआय | आधार लिंकिंग | स्कील इंडिया | स्टार्टअप इंडिया | अमृत भारत योजना

अशी पूर्ण केली हॅट्रिक 

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. मात्र, तेलगू देसम पार्टी आणि जनता दल (यू) यांच्या पाठिंब्याने सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आले. 

अशाप्रकारे नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान बनण्याची हॅट्रिक केली. लागोपाठ तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची त्यांनी ९ जून २०२४ रोजी शपथ घेतली.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतJapanजपानEconomyअर्थव्यवस्था