शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

संयुक्त राष्ट्रात भारतानं काढली पाकिस्तानची खरडपट्टी; जगाला दाखवला 'दहशतवादी' चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 12:04 IST

आपल्यातील काही देश राजकीय अजेंडा डोळ्यासमोर ठेवून दहशतवादाला योग्य ठरवण्याचा प्रयत्न करतात हा दुर्दैवी प्रकार आहे असं भारताने म्हटलं. 

न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत दहशतवादावरूनभारतानंपाकिस्तानची खरडपट्टी काढली आहे. दहशतवाद हा जगासाठी धोकादायक आहे. जगातील सुरक्षेवर त्याचे मोठे आव्हान आहे. क्रॉस बॉर्डर नेटवर्कही त्यापैकी एक आहे. दहशतवाद्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून स्वत:ची ताकद वाढवली आहे. ते आज अत्याधुनिक हत्यारे वापरत आहेत. एकमेकांच्या साहाय्याने दहशतवादाला हरवलं जाऊ शकते असं सांगत भारतानेपाकिस्तानकडून दहशतवादाला मिळणाऱ्या खतपाणीवर कठोर भाष्य केले आहे.

भारताने पुढे म्हटलं की, दहशतवादाशी कसं लढायचं यावर जगात अद्याप एकमत होऊ शकत नाही. दहशतवादावर ९/११ च्या हल्ल्यानंतर जगाला जाग आली. नोव्हेंबर १९९६ साली भारताने पहिल्यांदा जागतिक दहशतवादावर एक व्यापक चर्चेसाठी पुढाकार घेतला होता. जवळपास याला ३० वर्ष झाली तरीही सहमती बनली नाही. जेव्हा जगाने दहशतवादाला गांभीर्याने घेतले नाही तेव्हापासून भारत सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा सामना करत आहे. मागील ३ दशकात भारतात हजारो लोक मारले गेलेत. २००८ साली मुंबईत दहशतवादी हल्ला झाला, २०१६ साली पठाणकोट एअरबेसजवळ स्फोट, २०१९ मध्ये पुलवामात आत्मघातकी हल्ला हे  त्यातील एक आहे. भारत झीरो टॉलरेंस दाखवून दहशतावादाशी लढेल असं सांगण्यात आले.

तसेच आपल्यातील काही देश राजकीय अजेंडा डोळ्यासमोर ठेवून दहशतवादाला योग्य ठरवण्याचा प्रयत्न करतात हा दुर्दैवी प्रकार आहे. अशा देशांमुळे दहशतवादाशी लढण्याच्या संकल्पाला धक्का पोहचतो. याच देशांमुळे १५ वर्षानंतरही २६/११ मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड आजही सरकारी सुविधेत वेगवेगळ्या देशात फिरतो. हे देश केवळ दहशतवादाला प्रोत्सहन देत नाही तर त्यांच्या सरकार आणि एजेन्सीकडून स्वत:साठी स्टेट पॉलिसी बनवतात असंही भारताने पाकिस्तानला नाव न घेता सुनावले आहे.

दरम्यान, आपल्या कुख्यात अजेंड्याकडे जगाचं लक्ष जावू नये यासाठी दिशाभूल करत हे देश स्वत: दहशतवादी पीडित असल्याचं जगाला दाखवून देत राहतात. संयुक्त राष्ट्राकडून प्रतिबंद असलेल्या दहशतवादी संघटना जशा लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद भारताच्या जमिनीवर हल्ले करत राहतात. त्याविरोधात मजबूत कायदेशीर कारवाई करण्याची आजची गरज आहे असंही भारताने संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत म्हटलं आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ