शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

भारताने सेशल्सला दिले डॉर्नियर विमान, हिंदी महासागरात भारताचे महत्त्व वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 5:33 PM

भारताने भेट म्हणून आणखी एक डॉर्नियर विमान सेशेल्सला दिले आहे.

नवी दिल्ली- भारताने हिंदी महासागरामध्ये अत्यंत महत्त्वाच्या जागी असणाऱ्या सेशेल्सला दुसरे डॉर्नियर विमान भेट म्हणून दिले आहे. सागरी संकटांपासून वाचण्यासाठी या विमानाचा आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी सेशेल्सला या विमानाची मदत होणार आहे.  कालच भारताचा सेशेल्समध्ये नौदल तळ उभारण्यासाठी सकारात्मक बोलणी होऊन हा प्रलंबित मुद्दा मार्गी लागला आहे. भारताचे पंतप्रधान आणि सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष यांच्यामध्ये काल विविध विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये दोन्ही नेत्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी हे विमान सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॅनी फॉरे यांच्याकडे आज सुपूर्द केले. फॉरे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. हे विमान सेशेल्सला सागरी संकटांचा सामना करण्यासाठी वापरता येईल, आमच्या पंतप्रधानांनी सेशेल्सला मार्च 2015मध्ये भेट दिली होती त्यावेळेस या भेट म्हणून आणखी एक डॉर्नियर विमान देण्याची घोषणा केली होती. असे सुषमा स्वराज यांनी यावेळेस सांगितले.भारताने हे विमान देण्याचे आश्वासन पूर्ती करण्याचा हा ऐतिहासिक दिवस आहे. जून 29 रोजी सेशेल्सचा राष्ट्रीय दिन आहे. हे विमान सागरी संकटांपासून बचाव करण्यासाठी सेशेल्सला उपयोगी पडेल अशी मला खात्री आहे अशा शब्दांमध्ये स्वराज यांनी आपले मत मांडले. तत्पुर्वी या दोन्ही नेत्यांनी नवी दिल्ली येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली आहे. काल नौदलाचा तळ उभारण्यासंदर्भात झालेल्या करारानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते,'' भारत आणि सेशल्स प्रमुख सामरिक सहकारी आहेत. आम्ही लोकशाहीच्या मुलभूत सिद्धांताचा सन्मान करतो.तसेच हिंदी महासागरात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य कायम राखण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.'' काल भारत आणि सेशल्समध्ये एकूण सहा करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. तसेच सेशल्सला आपली सागरी सुरक्षा भक्कम करण्यासाठी दहा कोटी डॉलर कर्ज देण्याचे भारताने मान्य केले. 

टॅग्स :IndiaभारतSushma Swarajसुषमा स्वराज