शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Russia vs Ukraine War: इकडे आड अन् तिकडे विहीर! युक्रेन-रशियाच्या युद्धानं भारत पेचात; अडचणीत मोदी सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 18:41 IST

Russia vs Ukraine War: युक्रेन-रशियाच्या युद्धामुळे भारतासमोर मोठा पेच; मोदी सरकारच्या भूमिकेकडे जगाचं लक्ष

Russia-Ukraine Crisis: रशियानं युक्रेनवर हल्ला करत युद्धाची घोषणा केली आहे. रशियाचे रणगाडे युक्रेनमध्ये शिरले आहेत. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलियासह जगातील अनेक देशांनी रशियाचा निषेध केला आहे. काही देशांनी निर्बंधदेखील लादले आहेत. मात्र रशिया माघार घेण्यास तयार नाही. आता संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे आहे. भारत सरकारनं याबद्दल अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. भारतावर दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

२०१४ मध्ये रशियानं क्रिमिया ताब्यात घेतला. तेव्हा भारतानं रशियाच्या बाजूनं भूमिका घेतली होती. क्रिमिया ताब्यात घेतल्यानंतर रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांचा भारतानं निषेध केला होता. जगाची तमा न बाळगता भारत आपल्या जुन्या मित्रासोबत उभा राहिला. मात्र तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आता भारत अमेरिका आणि युरोपियन देशांच्या जवळ गेला आहे. चीनच्या आक्रमक पवित्र्यानं भारतासमोर आव्हानं उभं केलं आहे. पाकिस्तान रशियासोबत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या मॉस्कोमध्येच आहेत.

भारताचा समावेश जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांमध्ये होतो. २०१४ मध्ये युक्रेन-रशियात संघर्ष झाला. पुतीन यांनी क्रिमिया रशियाला जोडला. त्यावेळी भारतानं रशियाचं समर्थन केलं होतं. त्यावेळीही अमेरिका, युरोपियन युनियन आणि अन्य अनेक देश रशियाचा निषेध करत होते. रशियाला जी८ गटातून बाहेर काढण्यात आलं. निर्बंध लादण्यात आले. मात्र पुतीन जराही मागे हटले नाहीत.

मोठा आंतरराष्ट्रीय दबाव असताना व्लादिमीर पुतीन यांनी २०१४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता. क्रिमियामधील परिस्थिती पुतीन यांनी सिंग यांना सांगितली. दुसऱ्याच दिवशी भारतानं भूमिका जाहीर केली. आम्ही आमचा विश्वासू साथीदार असलेल्या रशियासोबत उभे आहोत. त्यांच्यावर घालण्यात आलेल्या निर्बंधांचा आम्ही निषेध करतो, अशी ठाम भूमिका सिंग सरकारनं घेतली. त्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. पण या विषयावरील भारताची भूमिका बदलली नाही.

आता भारत काय करणार?२०१४ ते २०२२ या ८ वर्षांत परिस्थिती बरीच बदलली आहे. अमेरिका आणि युरोपियन देशांसोबतचे भारताचे संबंध अधिक घनिष्ठ झाले आहेत. रशियासोबतचे संबंध आणखी दृढ झाले आहेत. या कालावधीत चीन बराच आक्रमक झाला आहे. तर रशिया आणि चीनचे संबंध गेल्या काही महिन्यांत सुधारले आहेत. भारतानं पाश्चिमात्य देशांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास रशिया आणि चीन या देशांशी एकाचवेळी शत्रुत्व निर्माण होईल.

दुसरीकडे पाकिस्तान रशियासोबतचे संबंध सुधारण्याच्या प्रयत्नात आहे. संपूर्ण जग पुतीन यांच्यावर टीका करत असताना इम्रान खान मॉस्कोत आहेत. भारत आणि रशियाचे संबंध जुने आहेत. मात्र अमेरिका आणि युरोपियन देशांसोबतचे संबंधदेखील भारताला खराब करायचे नाहीत. त्यामुळे या प्रकरणात भूमिका घेणं भारतासाठी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनNarendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंग