शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

Corona Vaccination: देशात कोरोनाचा कहर! मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; लवकरच घोषणा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 08:38 IST

Corona Vaccination: देशात सध्याच्या घडीला कोरोनावरील दोन लसींचा वापर; लवकरच आणखी लसींना परवानगी मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली: गेल्या महिनाभरापासून देशातील कोरोना बाधितांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. गेल्या सहा दिवसांपासून देशात दररोज कोरोनाच्या १ लाखाहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली असून अनेक भागांमध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यातच कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणखी पाच लसींना मंजुरी देण्याची शक्यता आहे. वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या अखेरपर्यंत याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकतो.फक्त १० दिवसात भारताला मिळणार तिसरी कोरोनाची लस; लसीच्या तुटवड्यावर आरोग्यमंत्र्यांची माहितीदेशात सध्याच्या घडीला दोन लसींचा वापर केला जात आहे. कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लसींचा वापर देशभरात सुरू आहे. देशात लसीकरणानं वेग घेतला असला तरी रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळेच आणखी पाच लसींना लवकरच मान्यता दिली जाईल, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं दिलं आहे. रेमडेसिविरच्या निर्यातीला बंदी, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णयनव्या लसींमध्ये डॉ. रेड्डीजच्या सहकार्यानं तयार होत असलेल्या स्पुटनिक व्ही, बायोलॉजिकल ईच्या सहकार्यानं तयार होत असलेली जॉन्सन अँड जॉन्सनची लस, सीरम इंडियाच्या सहकार्यानं तयार होत असलेल्या नोवोवॅक्स, झायडस कॅडिला आणि भारत बायोटेकच्या इंट्रानसल यांचा समावेश आहे. कोरोना लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली जात असताना केंद्र सरकारकडून सुरक्षा आणि परिणामकारकता यांचा प्राधान्यानं विचार केला जातो.रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीला पुढील १० दिवसांत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. लसीच्या उत्पादनासाठी रशियन प्रत्यक्ष गुंतवणूक निधी (आरडीआयएफ) आणि हैदराबादस्थित विरचो बायोटेक यांनी एक करार केला. त्यानुसार २० कोटी लसींचं उत्पादन करण्यात येईल. स्पुटनिक व्हीच्या ८.५ कोटी लसी भारताला मिळतील. सुत्रांच्या माहितीनुसार, जूनपर्यंत स्पुटनिक लस उपलब्ध होऊ शकेल. त्यानंतर जॉन्सन अँड जॉन्सन आणि झायडस कॅडिलाची लस ऑगस्टपर्यंत, तर नोवोवॅक्स सप्टेंबरपर्यंत आणि नसल लस ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध होऊ शकेल.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस