शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

'INDIA'ची स्थापना केली, पण ताळमेळ जुळेना, डावे म्हणाले आम्ही ममतां बॅनर्जींविरोधात लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 15:36 IST

Loksabha Election 2024: इंडिया या आघाडीच्या माध्यमातून तब्बल २६ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. मात्र परस्परविरोधी पक्षांचा समावेश असल्याने पहिल्या दिवसापासूनच या आघाडीमध्ये सूर जुळत नसल्याचे दिसत आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच भाजपाविरोधात एकत्रितपणे लढण्यासाठी इंडिया नावाने आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीच्या माध्यमातून तब्बल २६ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. मात्र परस्परविरोधी पक्षांचा समावेश असल्याने पहिल्या दिवसापासूनच या आघाडीमध्ये सूर जुळत नसल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार डाव्या पक्षांनी आपण पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींविरोधात लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 

विरोधी पक्षांची बैठक बोलावण्यामध्ये आणि आघाडीला नवं नाव देण्यामध्ये काँग्रेस, नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. काल विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी सांगितले की, ही लढाई एनडीए आणि इंडिया यांच्यातील आहे. ही लढाई  नरेंद्र मोदी आणि इंडिया यांच्यातील आहे. ही लढाई भाजपाची विचारसरणी आणि इंडिया यांच्यातील आहे. ही लढाई देशासाठी आहे. त्यामुळे आम्ही इंडिया हे नाव निवडलं आहे. तर ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, एनडीए किंवा भाजपा भारतला आव्हान देऊ शकतात? आम्हाला इंडियाला वाचवायचं आहे. देशाला वाचवायचं आहे. भारत जिंकणार, इंडिया जिंकणार, देश जिंकणार, भाजपा हरणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. 

याबाबत सीपीआय (एम)चे नेते सीताराम येचुरी यांनी तृणमूल काँग्रेससोबत कुठलीही आघाडी करण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले की, डावे पक्ष काँग्रेससह भाजपा आणि तृणमूल काँग्रेस या दोघांविरोधात लढतील. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससोबत कुठलीही आघाडी केली जाणार नाही. इंडियाकडून पंतप्रधानपदासाठी सध्यातरी कुठलाही चेहरा निवडला जाणार नाही. आघाडीतील सदस्य इंडियामधील घटकपक्षांमध्ये असलेली प्रतिस्पर्धा कमी करण्याचा प्रयत्न करतील. तसेच आघाडी ही विशिष्ट्य राज्यासाठी असेल.

दरम्यान, गेल्या आठवड्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी बंगालमध्ये पुढील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि डावे पक्ष मिळून तृणमूल काँग्रेसविरोधात लढतील, अशी घोषणा केली होती.  

टॅग्स :Communist Party of India (markjhista)कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (मार्क्झिस्ट)All India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसcongressकाँग्रेसwest bengalपश्चिम बंगाल