शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 10:49 IST

'ऑपरेशन सिंदूर'ने हे सिद्ध केले की, राफेल आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे भारताची युद्धनीती आजच्या युगात सर्वात प्रगत आणि अजिंक्य आहे.

पहलगामवरील क्रूर हल्ल्यानंतर भारताने दहशतवादाविरुद्ध 'ऑपरेशन सिंदूर' पुकारले. यावेळी, भारतीय शूरवीरांनी केवळ शत्रूचा खात्मा केला नाही, तर एका अशा चालीने पाकिस्तानला धडकी भरवली की, त्यांनी स्वतःच आपल्या पराक्रमाचे ढोल बडवत भारताचे राफेल विमान पाडल्याचा खोटा दावा केला. मात्र, सत्य तर राफेलच्या अदृश्य 'X-Guard डिकॉय सिस्टिम'मध्ये दडले होते, ज्याने पाकिस्तानच्या सर्व अत्याधुनिक रडार आणि मिसाइल यंत्रणांना अक्षरशः वेड लावले.

राफेलचे X-Guard सिस्टम कसे काम करते?X-Guard हे एक फायबर ऑप्टिक टो डिकॉय आहे, जे राफेलच्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिमचा एक भाग आहे. याचे मुख्य काम शत्रूच्या रडार-गाईडेड मिसाइल्स आणि जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या शस्त्रास्त्रांना दिशाभूल करणे हे आहे. हे डिकॉय शत्रूच्या रडारला राफेलचे खोटे लोकेशन देते आणि डॉपलर सिग्नल्सची तंतोतंत नक्कल करते.

हे फक्त २ सेकंदात सक्रिय होते आणि ३६० अंशांमध्ये ५००-वॉटचे जॅमिंग सिग्नल पाठवते. याची खासियत अशी आहे की, यामुळे शत्रूला असे वाटते की, त्यांनी खऱ्या राफेलला लक्ष्य केले आहे, पण प्रत्यक्षात ते डिकॉय असते.

भारताने पाकिस्तानला कसा दिला चकमा?माजी अमेरिकन फायटर पायलट रायन बोडेनहाइमर यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, हे मिशन आतापर्यंतची सर्वात उत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर डिकॉयिंग रणनीती होती. भारताने X-Guardच्या मदतीने पाकिस्तानचे 'जे-१० सी' फायटर जेट आणि 'पीएल १५ सी' मिसाइल्सला पूर्णपणे गोंधळात टाकले. पाकिस्तानच्या चिनी बनावटीच्या 'KLJ-7A AESA' रडारला हे ओळखता आले नाही की, त्यांनी खऱ्या विमानाला नाही, तर डिकॉयला लक्ष्य केले आहे. यामुळे पाकिस्तानने दावा केला की, त्यांनी एक भारतीय राफेल पाडले आहे, तर प्रत्यक्षात ते X-Guard होते.

डसॉल्ट आणि संरक्षण सचिवांचे काय म्हणणे आहे?डसॉल्ट एव्हिएशनचे चेअरमन एरिक ट्रॅपियर यांनी एका संरक्षण वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत कबूल केले की, भारताने एक राफेल विमान गमावले, परंतु याचे कारण तांत्रिक बिघाड होते. त्यावर शत्रूची कोणतीही कारवाई झालेली नाही. हे विमान १२००० मीटर उंचीवर एका लांब प्रशिक्षण मिशन दरम्यान क्रॅश झाले.

त्याच वेळी, भारताचे संरक्षण सचिव आर. के. सिंह यांनी स्पष्टपणे सांगितले की, पाकिस्तानने राफेल पाडल्याचा दावा खोटा आहे आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरमध्ये भारताच्या तंत्रज्ञानाने शत्रूला पूर्णपणे चकमा दिला.

चीनचा प्रॉपगंडाफ्रेंच मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनने आपल्या राजनैतिक नेटवर्कचा वापर करून राफेलची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला. राफेलची कामगिरी कमकुवत आहे, असे जगभरात चित्र निर्माण करण्याचा त्यांचा कुटिल डाव होता. मात्र, 'ऑपरेशन सिंदूर'ने हे सिद्ध केले की, राफेल आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे भारताची युद्धनीती आजच्या युगात सर्वात प्रगत आणि अजिंक्य आहे. या एका ऑपरेशनने जगाला दाखवून दिले की, भारताच्या ताकदीला कमी लेखणे शत्रूंना किती महागात पडू शकते.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तानRafale Dealराफेल डील