संरक्षण खर्चात भारत पाचवा

By Admin | Updated: April 25, 2017 00:46 IST2017-04-25T00:46:43+5:302017-04-25T00:46:43+5:30

संरक्षणावर २०१६ मध्ये सर्वाधिक खर्च करणाऱ्या पहिल्या १५ देशांत भारताचा पाचवा क्रमांक असून, या अवधीत भारताच्या संरक्षणावरील

India fifth in defense spending | संरक्षण खर्चात भारत पाचवा

संरक्षण खर्चात भारत पाचवा

नवी दिल्ली : संरक्षणावर २०१६ मध्ये सर्वाधिक खर्च करणाऱ्या पहिल्या १५ देशांत भारताचा पाचवा क्रमांक असून, या अवधीत भारताच्या संरक्षणावरील खर्चात ८.५ टक्के वाढ झाली आहे, असे स्टॉकहोमस्थित इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.
या अहवालानुसार भारताने २०१६ मध्ये संरक्षणासाठी एकूण ५५.९ अब्ज डॉलर खर्च केले. पहिल्या पंधरात पाकिस्तान नाही. पाकिस्तानने २०१६ मध्ये ९.९३ अब्ज डॉलरचा खर्चकेला.
भारताच्या संरक्षण खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. २०१६ मध्ये अमेरिकेच्या संरक्षण खर्चात १.७ टक्के, तर चीनच्या खर्चात ५.४ टक्के वाढ झाली आहे. २०१६ मध्ये जगभरातसंरक्षणावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या पाच देशांत अमेरिका, चीन, रशिया, सौदी अरब आणि भारताचा समावेश आहे.


1- अमेरिकेने २०१६ मध्ये संरक्षणावर ६११ अब्ज डॉलर खर्च केले. २०१५ च्या तुलनेत अमेरिकेच्या संरक्षण खर्चात १.७ टक्के वाढ झाली.
2- चीनने २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये २१५ अब्ज डॉलर खर्च केले असून, चीनच्या एकूण खर्चात ५.४ टक्के वाढ झाली आहे.
3- रशियाच्या संरक्षण खर्चात ५.९ टक्के वाढ झाली असून, एकूण खर्च ६९.२ अब्ज डॉलर झाला.


तणाव असतानाही सौदीने केली खर्चात कपात-
संरक्षण खर्चात सौदी अरब २०१५ मध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता. आता सौदी अरब चौथ्या क्रमांकावर आहे. २०१५ च्या तुलनेत सौदी अरबने २०१६ मध्ये संरक्षण खर्चात ३० टक्के कपात केली आहे.
तणावाला सामोरे जावे लागत असताना सौदी अरबची संरक्षण खर्चातील कपात हैराण करणारी आहे. २०१६ मध्ये सौदी अरबने संरक्षणावर ६३.७ अब्ज डॉलर खर्च केले.

आशियायी देशांत संरक्षण खर्चात ४.६ टक्के वाढ झाली आहे. अनेक देशांदरम्यान असलेला तणाव आणि दक्षिण चिनी समुद्राचा वाद हे या तणावाचे कारण सांगितले जाते.
मध्य-पूर्व देशांत एकूण जीडीपीच्या सरासरी ६ टक्के खर्च झाला असून, हे प्रमाण जगाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. अमेरिकेने जीडीपीच्या तुलनेत १.३ टक्के खर्च संरक्षणावर खर्च केला.

Web Title: India fifth in defense spending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.