शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

९९ टक्क्यांहून अधिक भारतीय उत्पादनांना युरोपमध्ये थेट 'झीरो ड्युटी' प्रवेश मिळणार; कापड, ऑटोमोबाइल आणि आयटी क्षेत्राला मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 06:21 IST

India-EU FTA 2026: अमेरिकेने लादलेल्या ५० टक्के टॅरिफच्या पार्श्वभूमीवर, भारताने 'युरोपीय महासंघा'सोबतच्या ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराला (एफटीए) अंतिम रूप दिले आहे. यामुळे भारताच्या निर्यातीला नवी झळाळी मिळणार आहे.

नवी दिल्ली - अमेरिकेने लादलेल्या ५० टक्के टॅरिफच्या पार्श्वभूमीवर, भारताने 'युरोपीय महासंघा'सोबतच्या ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराला (एफटीए) अंतिम रूप दिले आहे. यामुळे भारताच्या निर्यातीला नवी झळाळी मिळणार आहे. या करारामुळे जागतिक जीडीपीमध्ये २५% वाटा असलेल्या दोन मोठ्या अर्थव्यवस्था एकत्र आल्याने भारताचे जागतिक स्थान भक्कम झाले आहे.

भारत व युरोपीय महासंघ या दोन मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. आता या करारामुळे ९९ टक्के भारतीय वस्तूंना युरोपच्या बाजारपेठेत थेट प्रवेश मिळेल. विशेष म्हणजे, युरोप ९६.८ टक्के उत्पादनांवरील शुल्क पूर्णपणे हटवणार आहे. रत्ने व दागिने, कापड, चामड्याच्या वस्तू, चहा, कॉफी, मसाले, फळे या वस्तूंच्या निर्यातीस करारामुळे चालना मिळेल. तसेच आयटी व्यावसायिकांना युरोपात प्रवेश करण्यात सुलभता मिळेल.

भारत-युरोपीय महासंघाचा व्यापार किती?भारताकडून निर्यात : डिझेल, विमान इंधन, स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, रसायने, औषधे, लोखंड व पोलाद, हिरे, दागिनेभारतात आयात : यंत्रसामग्री, औद्योगिक उपकरणे, टर्बोजेट इंजिने, मोबाईल पार्ट्स, इलेक्ट्रॉनिक चिप्स, विमाने, वैद्यकीय उपकरणे

कराराची ठळक वैशिष्ट्ये काय? रोजगार निर्मिती : कापड, दागिने, चामड्याच्या वस्तू, ऑटोमोबाईल अशा कामगारप्रधान क्षेत्रातील ३३ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवरील कर रद्द होत रोजगार वाढेल.लघु उद्योगांना बळ : याचा थेट फायदा महिला, तरुण, कारागीर आणि एमएसएमई उद्योगांना होऊन भारतीय कंपन्या जागतिक साखळीशी जोडल्या जातील.कालबद्ध अंमलबजावणी: भारत १० वर्षांत ९३% व्यापार मूल्यावर, तर युरोप ७ वर्षांत भारतीय वस्तूंवरील शुल्क शून्यावर आणेल.व्यावसायिकांना संधी : केवळ वस्तूच नाही, तर कुशल भारतीय व्यावसायिकांना (प्रोफेशनल) युरोपमध्ये काम करण्यासाठी 'मोबिलिटी फ्रेमवर्क' अंतर्गत सुलभता मिळेल.डिजिटल व्यापार : पारंपरिक वस्तूंसह डिजिटल कॉमर्स, कस्टम प्रक्रियेत सुलभता आणली जाईल.ग्राहकांचा फायदा :  भारतीय ग्राहकांना जागतिक दर्जाच्या वस्तू रास्त दरात मिळतील.शेतकऱ्यांना लाभ: चहा, कॉफी, मसाले, फळांच्या निर्यातीला मोठी संधी मिळाल्याने ग्रामीण उत्पन्न वाढेल. भारताने दूध, धान्य आणि पोल्ट्री यांसारखी क्षेत्रे करारातून बाहेर ठेवून देशहित सुरक्षित ठेवले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : India-EU trade deal: Zero duty access for 99% Indian products.

Web Summary : India and EU finalize FTA, granting 99% Indian products zero-duty access. Key sectors like textiles, auto, and IT will benefit from reduced tariffs and easier market entry, boosting exports and creating jobs.
टॅग्स :IndiaभारतTrade Tariff Warटॅरिफ युद्धInternationalआंतरराष्ट्रीयbusinessव्यवसाय