शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

इस्रोनं रचला इतिहास, स्वदेशी बनावटीच्या IRNSS-1आय उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 07:29 IST

भारतीय अवकाश संशोधन संस्थे(इस्रो)नं आणखी एक नवा इतिहास स्वतःच्या नावे केला आहे. इस्रोनं आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा येथून  IRNSS-1आय उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. 

नवी दिल्ली-  भारतीय अवकाश संशोधन संस्थे(इस्रो)नं आणखी एक नवा इतिहास स्वतःच्या नावे केला आहे. इस्रोनं आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून पहाटे 4 वाजून 4 मिनिटांनी IRNSS-1आय उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. पीएसएलव्ही-सी 41 रॉकेटमधून IRNSS-1आय उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं. विशेष म्हणजे IRNSS-1आय हा उपग्रह स्वदेशी बनावटीचा आहे. IRNSS-1I या सॅटेलाइटचं वजन 1425 किलोग्राम आहे. तसेच त्या उपग्रहाची लांबी 1.58 मीटर, उंची 1.5 मीटर आणि रुंदी 1.5 मीटर असून, हा उपग्रह बनवण्यासाठी 1420 कोटी रुपयांइतका खर्च आला आहे. या उपग्रहामुळे देशातील जीपीएस प्रणाली सक्षम होण्यासाठी मदत होणार असून, समुद्रातील दिशा समजण्यासाठीही हा ग्रह फायदेशीर ठरणार आहे. तसेच या सॅटेलाइटचा नौदलाला मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी स्वदेशी बनावटीच्या GSAT-6A या उपग्रहाचं इस्रोनं यशस्वीरीत्या प्रक्षेपण केल्यानंतर आता त्या उपग्रहाशी संपर्क तुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. GSAT-6A या उपग्रहाचा भारतीय अवकाश संशोधन संस्थेशी संपर्क खंडित झाला. यामुळे शास्त्रज्ञांबरोबरच लष्करालाही मोठा झटका बसला. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रावरून GSAT-6A या उपग्रहानं गुरुवारी 4.56च्या सुमारास GSLV रॉकेटमधून अवकाशात प्रक्षेपण करण्यात आलं होतं. परंतु 48 तासांपेक्षा कमी वेळात या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. GSAT-6A या उपग्रहाशी आमचा तिस-या दिवशी संपर्क तुटला आहे. तसेच या GSAT-6A या उपग्रहाशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असंही इस्रोकडून सांगण्यात आलं होतं. पॉवर सिस्टीम फेल झाल्यामुळे संपर्क तुटल्याचं आता बोललं जातंय. तिस-या कक्षेत गेल्यानंतर उपग्रहाशी संपर्क तुटला आहे. 

टॅग्स :isroइस्रो