शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

India China Faceoff : खिंडीत गाठलं! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' विधानाबद्दल भारताची अन् देशवासीयांची माफी मागावी; काँग्रेस आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 11:22 AM

रात्री दोनच्या सुमारास दोन्ही उच्च अधिका-यांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर चिनी सैन्याला गलवान खो-यातून माघार घ्यायला भारतानं भाग पाडले. या प्रकरणी आता कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.

भारत आणि चीनदरम्यानची तणावपूर्ण परिस्थिती आजपासून काहीशी सामान्य होताना दिसते आहे. भारताच्या वतीने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पुढाकार घेत चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली. रात्री दोनच्या सुमारास दोन्ही उच्च अधिका-यांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर चिनी सैन्याला गलवान खो-यातून माघार घ्यायला भारतानं भाग पाडले. या प्रकरणी आता कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी सोमवारी पंतप्रधानांना माफी मागण्यास सांगितले. खेडा म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या जुन्या विधानाबद्दल माफी मागावी, ज्यात त्यांनी म्हटले आहे की, चीननं आमच्या हद्दीत प्रवेश केलेला नाही. 

विशेष म्हणजे चीनने अधिकृत वक्तव्य केले असून, कबुलीजबाब देऊन भारताशी वाढता तणाव कमी करण्यासाठी सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलिंग पॉइंट 14वर दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने उभे होते, तेथून दोन्ही देशांचे सैनिक काही किलोमीटर मागे सरकले आहेत. आता कॉंग्रेसने या प्रकरणावरून पुन्हा एकदा मोदींवर हल्लाबोल केला आहे. कॉंग्रेसचे म्हणणे आहे की, पंतप्रधानांनी आधीच्या वक्तव्यावर माफी मागावी आणि पंतप्रधान किंवा स्वत: संरक्षण मंत्र्यांनी देशातील जनतेसमोर यावे आणि लडाखमधील सध्या काय परिस्थिती आहे हे स्पष्ट करावे.कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा येथेच थांबले नाहीत. ते म्हणाले, 'पंतप्रधान मोदींनी या संधीचा फायदा घ्यावा. राष्ट्राला संबोधित केले पाहिजे, देशाला विश्वासात घेतले पाहिजे, देशाची माफी मागायला हवी. होय मी चूक केली, असं मान्य करायला हवं. मी तुमची दिशाभूल केली किंवा ते माझे शब्दात चुकीचे होते, असं मोदींनी सांगितलं पाहिजे.  15 जून रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला आणि दोन्ही देशांचे नुकसान झाले. त्यानंतर पीएम मोदी यांनी एक निवेदन दिले. आता कॉंग्रेस पंतप्रधान मोदींना त्यांच्या जुन्या विधानाबद्दल माफी मागण्यास सांगत आहे, ज्यात ते म्हणाले होते की, कोणीही भारतीय हद्दीत आलेले नाही किंवा कोणीही भारताच्या भूभागावर कब्जा केलेला नाही.सैन्याला कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही: खेराकॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा म्हणाले आहेत की, आमचे शूर सैन्य चिनी पीएलएला मागे रेटण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्यात ते यशस्वी झाल्याचा पाहून आम्हाला आनंद झाला. आम्हाला आमच्या सैन्याचा अभिमान आहे. सैन्याच्या क्षमतेबद्दल आमच्या मनात कधीच शंका निर्माण झालेली नाही. आमच्या सैन्याला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही.

हेही वाचा

चीनच्या अडचणी वाढल्या; जिनपिंग सरकारविरोधात मुस्लिम थेट आंतरराष्ट्रीय कोर्टात

CoronaVirus: नवरी नटली; सुपारी फुटली अन् वराती मंडळींना ५० हजार दंडाची रक्कम भरावी लागली

मोठी बातमी! बँकेत अन् पोस्टात FD आहे? मग आजच जमा करा 'हे' दोन फॉर्म अन्यथा होणार मोठे नुकसान

India China FaceOff: चीनशी युद्ध झाल्यास भारतासोबत अमेरिकेची सेनाही लढणार, व्हाइट हाऊसची मोठी घोषणा 

जगात टाळेबंदी; पोस्टात मिळतेय नोकरीची सुवर्णसंधी; 10वी पास असलेल्यांनी आजच अर्ज करा

चीनला घेरलं! दक्षिण चिनी समुद्रात अमेरिकेनं पाठवल्या दोन घातक विमानवाहू युद्धनौका

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीindia china faceoffभारत-चीन तणाव