नवी दिल्ली: पूर्व लडाखमधल्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमधील तणाव वाढला आहे. त्यातच आता गलवान नदीच्या खोऱ्यातील चिनी सैन्याच्या हालचाली वाढल्यानं संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे. गलवान नदीच्या खोऱ्यात अनेक ठिकाणी तंबू उभारण्यात आल्याचं उपग्रहांमधून टिपण्यात आलेल्या छायाचित्रांमधून दिसून येत आहे. त्यामुळे या भागात चिनी सैन्य मोठ्या प्रमाणात तैनात असल्याचं सिद्ध झालं आहे.नऊ किलोमीटरच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चिनी लष्कराचे किमान १६ कॅम्प आहेत. त्यामुळे चीन मागे हटायला तयार नसल्याचं स्पष्ट दिसतं आहे. उलट चीननं या भागातील सैनिकांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे भारतीय जवानांना असलेला धोका वाढला आहे. एनडीटीव्हीनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. २२ जूनला भारत आणि चीनच्या लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. त्यामध्ये पूर्व लडाखमधील वादग्रस्त भागातील तणाव निवळण्यासाठी सैन्य मागे घेण्याबद्दल एकमत झालं.
India China Faceoff: झटापट झालेल्या भागात चीननं उभारले १६ कॅम्प; ड्रॅगन मोठ्या घुसखोरीच्या प्रयत्नात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 08:10 IST