शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
2
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
3
निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
4
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
5
'मोदी 3.0', Exit Poll वर पाकिस्तान, रशिया, चीन, सौदीसह जगभरातील मीडियाने काय म्हटले?
6
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
7
धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..?
8
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
9
दलजीतविरोधात निखिल पटेलची कायदेशीर कारवाई, पत्नीला थेट इशारा देत म्हणाला...
10
सरकार बनताच अॅक्शन मोडमध्ये येणार मोदी! बँकेसह या कंपनीतील हिस्सा विकण्याचा प्लान; शेअर्स बनले रॉकेट
11
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अंतरवाली सराटीतूनच विरोध, गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 
12
हिमाचल प्रदेशमध्ये ३ अपक्ष आमदारांचा राजीनामा मंजूर, आता या मतदारसंघात होणार पोटनिवडणूक
13
निकालाआधीच दिल्लीत हालचालींना वेग! नितीश कुमार यांनी पीएम मोदींची घेतली भेट, अमित शहा यांचीही भेट घेणार
14
शिवसेना तोडली, पण उद्धव ठाकरेंना संपवू शकले नाहीत; महाराष्ट्राचा एक्झिट पोल, भाजपाला सतावणारा
15
सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार-नोटामध्ये निवडणूक का नाही? आयुक्त राजीव कुमारांनी केले स्पष्ट
16
Lipi Rastogi Suicide Note : मुंबईत आयएएस दाम्पत्याच्या मुलीची आत्महत्या, 'सुसाइड नोट'मध्ये काय? आलं समोर...
17
"आश्वासक बदल दिसला नाहीतर मी..."; CM शिंदेंचा उल्लेख करत शरद पवारांचा सरकारला इशारा
18
"कोणी केले सांगा, आम्ही त्यांना शिक्षा देऊ"; अमित शाह यांनी धमकावल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
19
भारतातल्या पहिल्या निवडणुकीच्या मास्टरमाईंडवर येतोय सिनेमा, विद्या बालनच्या पतीची मोठी घोषणा
20
विजयापूर्वीच जल्लोषाची तयारी, पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून भाजपा कार्यालयापर्यत होणार रोड शो  

India China Faceoff: भारत-चीन सैन्यातील हिंसक झटापटीनंतर पंतप्रधान मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 2:01 PM

India China Faceoff: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे.

नवी दिल्लीः लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे. गलवान  खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत कमांडिंग ऑफिसरसह 20 भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती भारतीय सैन्याने एका निवेदनाद्वारे दिली आहे. या संघर्षात चीनलाही खूप नुकसान सहन करावं लागलं आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे आणि मुत्सद्देगिरीच्या पातळीवर तो सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनबरोबर सुरू असलेल्या वादावर सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे. १९ जून रोजी संध्याकाळी पाच वाजता सर्व पक्षांचे प्रमुख आभासी बैठकीद्वारे यात सहभागी होणार आहेत. या विषयावर विरोधी पक्षांकडून सर्वपक्षीय बैठक बोलविण्याची सतत मागणी होत होती. त्याच पार्श्वभूमीवर मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे सोमवारी रात्री गॅलवान खो-यात भारत आणि चीनच्या सैन्यात हिंसक चकमक झाली. या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले. याखेरीज भारताच्या चार जवानांची परिस्थिती गंभीर आहे. लष्कराने याची खातरजमा केलेली आहे. त्याचवेळी या हिंसक चकमकीत चिनी सैन्याचंही मोठं नुकसान झालं आहे. भारत-चीन सीमेवर हौतात्म्य आलेल्या आपल्या 20 जवानांची नावे आज जाहीर करण्यात येणार आहे. चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत या जवानांना हौतात्म्य आले आहे. ही घटना 15-16 जूनदरम्यानच्या रात्री घडली होती. भारतीय सैनिकांचे पथक कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्वात चिनी कॅम्पमध्ये गेले होते. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे शस्त्र नव्हते. हे पथक चिनी सैन्याच्या मागे हटण्याच्या मुद्यावर झालेल्या सहमतीसंदर्भात बोलणी करण्यासाठी गेले होते.मात्र, तेथे भारतीय जवानांना चिनी सैनिकांनी दगा दिला. दगड, काटेरी तारा आणि खिळे असलेल्या काठ्यांनी चिनी सैनिकांनी या पथकावर हल्ला केला. यात कमांडिग ऑफिसर कर्नल संतोष बाबू आणि दोन जवान तेथेच शहीद झाले. तर अनेक जवान जखमी झाले. ज्या ठिकाणावर ही चकमक झाली त्याच्या खालून श्योक नदी वाहते. अनेक सैनिक या नदीत वाहून गेल्याचेही वृत्त आहे. भारताने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात 20 जवानांना हौतात्म्य आल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन