शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

India China FaceOff: एलएसीवरील तणावादरम्यान ब्रिक्स संमेलनात मोदी आणि जिनपिंग येणार आमने-सामने

By बाळकृष्ण परब | Updated: October 5, 2020 21:09 IST

भारत आणि चीनमध्ये तणाव निवळण्यासाठी विविध पातळीवरील बैठका झाल्या आहेत. आता या तणावाच्या वातावरणामध्येच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे आमने-सामने येणार आहेत.

ठळक मुद्देतणावाच्या वातावरणामध्येच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे आमने-सामने येणार आहेतकोरोनाच्या संसर्गामुळे १२ वे ब्रिक्स शिखर संमेलन यावेळी व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार आहेहे संमेलन १७ नोव्हेंबर रोजी होणार आहे

नवी दिल्ली - चिनी सैन्याने लडाखमध्ये केलेला घुसखोरीचा प्रयत्न आणि गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीमुळे भारत आणि चीनमधील संबंध सध्या कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यासाठी विविध पातळीवरील बैठका झाल्या आहेत. आता या तणावाच्या वातावरणामध्येच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे आमने-सामने येणार आहेत.कोरोनाच्या संसर्गामुळे १२ वे ब्रिक्स शिखर संमेलन यावेळी व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार आहे. हे संमेलन १७ नोव्हेंबर रोजी होणार असून, मिळालेल्या माहितीनुसार प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. सीमेवर कमालीचे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील भेटीची ही पहिलीची वेळ असेल. ही भेट व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगच्या माध्यमातून व्हर्च्युअल पद्धतीने आयोजित होईल.या वर्षीच्या ब्रिक्स शिखर संमेलनामधील बैठकीचा विषय जागतिक स्थैर्य, संयुक्त संरक्षण आणि अभिनव विकासामध्ये ब्रिक्सची भागीदारी हा आहे. २०२० मध्ये या संघटनेतील पाच प्रमुख देशांनी शांतता आणि संरक्षण, अर्थव्यवस्था आणि वित्त, सांस्कृतिक आणि देवाण-घेवाणीवरील भागीदारी कायम ठेवली आहे.दरम्यान, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचे सल्लागार अँटोन कोबायाकोव्ह यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या फैलावामुळे जागतिक पातळीवर चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असली तरी २०२० मध्ये रशियाच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्सचे संमेलन अत्यंत सुसंगत पद्धतीने आयोजित केले जात आहे.दुसरीकडे भारत आणि चीनमधील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र या परिस्थितीतही चीनच्या प्रत्येक कारस्थानाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने सतर्कता वाढवली आहे. अशा परिस्थितीत चिनी सेनेला माघार घेण्यास लावण्यासाठी तसेच चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ताकद वाढवण्याच्या करारापासून मागे हटत असेल तर अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठीही भारताने तयारी केली आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndiaभारतchinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदी