शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: भारत-चीन तणाव कायम, घुसखोरीचा प्रयत्न; भारतीय जवानांकडून प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 06:44 IST

भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने चिनी सैन्याचे घुसखोरीचे मनसुबे उधळले गेले. लडाखमधल्या पँगाँग सरोवरच्या दक्षिण किनाऱ्याजवळ भारत आणि चीनचे जवान भिडले. भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल्याने चिनी सैन्याला घुसखोरी करता आली नाही.

नवी दिल्ली: भारत आणि चीनमधील तणाव कायम आहे. २९ आणि ३० आॅगस्टला चिनी सैन्याने पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय जवानांनी त्यांचा प्रयत्न उधळून लावला. यानंतर चिनी सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने भारताला उघड धमकी दिली आहे. भारताला आमच्याशी कोणतीही स्पर्धा करायची असल्यास त्यांना १९६२ पेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागेल, असा इशारा ग्लोबल टाईम्सने दिला आहे.भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने चिनी सैन्याचे  घुसखोरीचे मनसुबे उधळले गेले. लडाखमधल्या पँगाँग सरोवरच्या दक्षिण किनाऱ्याजवळ भारत आणि चीनचे जवान भिडले. भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल्याने चिनी सैन्याला घुसखोरी करता आली नाही. यानंतर चीन सरकारने पुन्हा एकदा बातचीत करून प्रश्न सोडवण्याची भाषा सुरू केली. तर चिनी सरकारच्या ग्लोबल टाईम्सने भारताला थेट धमकी दिली आहे.‘भारतानं चिनी सैन्याला आधीच रोखले, असे भारताने म्हटले आहे. त्यामुळे भारतानेच आधी विध्वंसक पाऊल उचलले आणि संघर्षाची सुरुवात केली, हे स्पष्ट आहे. भारतामध्ये अनेक समस्या आहेत. रविवारी भारतात ७८ हजार कोरोना रुग्ण आढळले. त्यांच्या अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील तणाव वाढवून भारत देशातील समस्यांवरून लक्ष विचलित करू पाहतोय,' असे ग्लोबल टाईम्सने संपादकीय लेखात म्हटले आहे.पीपल्स लिबरेशन आर्मी देशाच्या इंचनइंच जमिनीचे संरक्षण करण्यास सज्ज आहे. भारत एका सामर्थ्यशाली चीनचा सामना करतोय, हे त्यांनी लक्षात ठेवावे. आमच्याकडे पुरेसे सैन्य आहे. चीन भारताला संघषार्साठी चिथावणी देत नाही. मात्र आम्ही आमच्या जमिनीवर अतिक्रमण होऊ देणार नाही. चिनी जनता सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखIndian Armyभारतीय जवानIndiaभारतchinaचीन