शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

लडाखमध्ये अत्याधुनिक सुविधा; कडाक्याच्या थंडीत चीनला घाम फोडण्यास जवान सज्ज

By कुणाल गवाणकर | Updated: November 18, 2020 16:53 IST

संपूर्ण हिवाळा लडाखमध्ये मुक्काम करण्याची तयारी; भारतीय जवानांना अत्याधुनिक सुविधा मिळणार

नवी दिल्ली: उन्हाळ्यापासून सुरू असलेला पूर्व लडाखमधील तणाव आजही कायम आहे. आता थंडीच्या दिवसात पारा घसरणार असल्यानं लडाखमध्ये तग धरणं दिवसागणिक अवघड होत जाणार आहे. त्यामुळे हिवाळ्यासाठी भारतीय लष्करानं विशेष तयारी केली आहे. पूर्व लडाखमध्ये दरवर्षी ४० फूट बर्फ पडतो. याशिवाय तापमान उणे ३० ते ४० अंशांपर्यंत घसरतं. त्यामुळे हिवाळ्यात चिनी सैन्याच्या आगळिकींचा सामना करण्यासाठी भारतीय जवान सज्ज झाले आहेत.हिवाळ्यात पूर्व लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होते. पारा प्रचंड घसरत असल्यानं या भागात तग धरून राहणं अतिशय आव्हानात्मक असतं. चीननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ रस्त्यांची कामं सुरू केली आहेत. त्यामुळे हिवाळ्यात सीमावर्ती भागातील वातावरण तापण्याची चिन्हं आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याच्या मुक्कामासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जवानांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यादृष्टीनं पूर्ण तयारी करण्यात आली आहे. हिवाळ्यात पारा घसरल्यानंतरही उबदार राहू शकेल, अशा प्रकारची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी गरम पाण्यासह विजेची सोयदेखील उपलब्ध आहे. जवानांच्या आरोग्याचा विचार करून स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे. भारतीय लष्करानं आज एका निवेदनाच्या माध्यमातून याबद्दलची माहिती दिली. 'जवानांच्या कारवायांची क्षमता वाढवण्यासाठी पूर्व लडाखमधील वास्तव्याची सुविधा अत्याधुनिक करण्यात आली आहे,' असं लष्करानं सांगितलं आहे.५ मेपासून पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये संघर्ष सुरू आहे. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला आहे. १५ जूनला दोन्ही सैन्यामध्ये हिंसक झटापट झाली होती. त्यात भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनचंही मोठं नुकसान झालं. यानंतर चीनला धडा शिकवण्यासाठी केंद्र सरकारनं सुरक्षेच्या कारणास्तव अनेक ऍप्सवर बंदी घातली. यामध्ये बहुतांश ऍप्स चिनी कंपन्यांचे होते.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाख