शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

India China Faceoff: भारत चीनचे सर्व मनसुबे उधळण्याच्या तयारीत; नव्या रणनीतीनं काढणार ड्रॅगनची हवा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 10:48 IST

चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताचा वेगळाच डाव; बलाढ्य देशांची साथ मिळणार

ठळक मुद्देभारताकडून कोरोनाच्या फैलावाच्या चौकशीची मागणीलडाखमध्ये सीमावाद उकरून काढणाऱ्या चीनला धक्का देण्याची रणनीतीलायन्स फॉर मल्टिलेटरलिस्मच्या बैठकीत भारत आक्रमक

नवी दिल्ली: चीनच्या वुहानमधून जगात कोरोनाचा फैलाव झाला. त्यामुळे जगभरातून चीनवर टीका झाली. कोरोना विषाणू जाणूनबुजून पसरवण्यात आल्याचे आरोप चीनवर झाले. कोरोनावरील लक्ष विचलित करण्यासाठी चीननं पूर्व लडाखमधील सीमावाद उकरुन काढला. त्यामुळे भारत आणि चीनमधील तणाव वाढला. जगातील दोन मोठ्या देशांमध्ये संघर्ष निर्माण झाल्यानं कोरोना प्रादुर्भावाचा मुद्दा मागे पडला. मात्र आता भारतानं पुन्हा एकदा या मुद्द्यावर भर दिला आहे. त्यामुळे चीनच्या अडचणी वाढणार आहेत. लडाखमधील सीमावाद वाढवण्यामागील चीनचा हेतू जगासमोर आणण्याची तयारी भारतानं सुरू केली आहे. कोरोना विषाणू नेमका कुठून पसरला याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी भारतानं पहिल्यांदाच जागतिक व्यासपीठावर केली आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलियानं कोरोनासाठी थेट चीनला जबाबदार धरलं आहे. त्यानंतर अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्ध भडकलं. तर ऑस्ट्रेलिया म्हणजे अमेरिकेचा कुत्रा असल्याची जहरी टीका चीनकडून करण्यात आली.कोरोनाचा फैलाव आणि त्याची तीव्रता याबद्दलची माहिती चीननं लपवल्याचा आरोप भारतानं केला होता. मात्र आता भारतानं आपली भूमिका आणखी आक्रमक केली आहे. कोरोना विषाणूच्या फैलावाची चौकशी करण्याची आग्रही मागणी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी अलायन्स फॉर मल्टिलेटरलिस्मच्या बैठकीत केली. आपल्याला राजकारण बाजूला ठेवून कोरोना नेमका कसा परसला, याकडे लक्ष द्यायला हवं. त्याचं मूळ शोधून काढायला हवं, अशी मागणी जयशंकर यांनी केली. यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या संकटाचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी करता येईल, असंदेखील ते म्हणाले.याआधी जागतिक आरोग्य परिषदेत २० मे रोजी एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. कोरोना विषाणू नेमका कुठून आला आणि तो लोकांमध्ये कसा पसरला, हे शोधून काढण्याची मागणी प्रस्तावातून करण्यात आली. या प्रस्तावाला १२२ देशांनी पाठिंबा दिला. कोरोना विषाणू प्राण्यांच्या माध्यमातून माणसांपर्यंत पोहोचला. वुहानमधील मांस बाजार कोरोनाच्या फैलावासाठी जबाबदार असल्याचा दावादेखील काही वृत्तांमधून करण्यात आला आहे....म्हणून लडाखमधील दु:साहसाची चीनला मोजावी लागेल मोठी किंमतझटापट झालेल्या भागात चीननं उभारले १६ कॅम्प; ड्रॅगन मोठ्या घुसखोरीच्या प्रयत्नात? 

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्याladakhलडाख