शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

India China FaceOff: ...तर १९६२ पेक्षा जास्त नुकसान होईल; घुसखोरीत अपयशी ठरलेल्या चीनची भारताला धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 11:06 AM

देशांतर्गत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी भारत तणाव वाढवतोय; चीनच्या उलट्या बोंबा

नवी दिल्ली: भारत आणि चीनमधील तणाव कायम आहे. २९ आणि ३० ऑगस्टला चिनी सैन्यानं पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय जवानांनी त्यांचा प्रयत्न उधळून लावला. यानंतर चिनी सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सनं भारताला उघड धमकी दिली आहे. भारताला आमच्याशी कोणतीही स्पर्धा करायची असल्यास त्यांना १९६२ पेक्षा जास्त नुकसान सहन करावं लागेल, असा इशारा ग्लोबल टाईम्सनं दिला आहे. LAC पार गेलेल्या जवानांना तात्काळ मागे बोलवा, चीनकडून भारतावर गंभीर आरोपभारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्यानं चिनी सैन्याचे घुसखोरीचे मनसुबे उधळले गेले. लडाखमधल्या पँगाँग सरोवरच्या दक्षिण किनाऱ्याजवळ भारत आणि चीनचे जवान भिडले. भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल्यानं चिनी सैन्याला घुसखोरी करता आली नाही. यानंतर चीन सरकारनं पुन्हा एकदा बातचीत करून प्रश्न सोडवण्याची भाषा सुरू केली. तर चिनी सरकारचं ग्लोबल टाईम्सनं भारताला थेट धमकी दिली आहे.शाब्बास पठ्ठ्यांनो! पँगौंग तलावानजीक ‘Strategic Height’वर भारताचा कब्जा; चीनला जबरदस्त दणका'भारतानं चिनी सैन्याला आधीच रोखलं, असं भारतानं म्हटलं आहे. त्यामुळे भारतानंच आधी विध्वंसक पाऊल उचललं आणि संघर्षाची सुरुवात केली, हे स्पष्ट आहे. भारतामध्ये अनेक समस्या आहेत. रविवारी भारतात ७८ हजार कोरोना रुग्ण आढळले. त्यांच्या अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील तणाव वाढवून भारत देशातील समस्यांवरून लक्ष विचलित करू पाहतोय,' असं ग्लोबल टाईम्सनं संपादकीय लेखात म्हटलं आहे.लडाखमध्ये राफेलच्या उपस्थितीनं चीन घाबरला, तैनात केली जे-20 विमानंपीपल्स लिबरेशन आर्मी देशाच्या इंचनइंच जमिनीचं संरक्षण करण्यास सज्ज आहे. भारत एका सामर्थ्यशाली चीनचा सामना करतोय, हे त्यांना लक्षात ठेवावं. आमच्याकडे पुरेसं सैन्य आहे. चीन भारताला संघर्षासाठी चिथावणी देत नाही. मात्र आम्ही आमच्या जमिनीवर अतिक्रमण होऊ देणार नाही. चिनी जनता सरकारच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे, असं ग्लोबल टाईम्सनं म्हटलं आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणाव