शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

India China FaceOff: चीनसोबतचा तणाव वाढला असताना लष्करप्रमुख लडाखमध्ये; परिस्थितीचा आढावा घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 11:32 IST

India China FaceOff: लष्करप्रमुख लडाखमधील परिस्थितीचा आढावा घेणार; दिल्लीत बैठकांचं सत्र सुरू

लडाख: भारत आणि चीनमधील तणाव गेल्या ४ महिन्यांपासून वाढला आहे. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांचे जवान आमनेसामने आले आहेत. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख मनोज नरवणे लडाखला पोहोचले आहेत. ते दक्षिण पँगाँग आणि अन्य भागांतील परिस्थितीची पाहणी करणार आहेत. चीनची घुसखोरी उधळण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज, पेंगाँग सरोवर, अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर क्षेपणास्त्रेही तैनातभारत आणि चीनचे सैन्य एकमेकांसमोर उभं ठाकल्यानं पूर्व लडाखमधील तणाव वाढला आहे. चीननं तीन दिवसांत दोनदा घुसखोरीचा प्रयत्न केला. पण भारतीय जवानांनी तो हाणून पाडला. या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख मनोज नरवणे लडाखला पोहोचले आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा आढावा घेण्याचं काम लष्करप्रमुख करणार आहेत. एका बाजूला लष्करप्रमुख लडाखला आले असताना दुसऱ्या बाजूला दिल्लीत बैठकांचं सत्र सुरू आहे.भारत-चीनमध्ये तिसऱ्या दिवशीही तणावपूर्ण चर्चा, भारताने दिला ड्रॅगनला तिसरा झटकाभारतीय सैन्याचा आक्रमक पवित्रातणाव निवळण्यासाठी बैठकांचं सत्र सुरू असताना चिनी सैन्याचे घुसखोरीचे प्रयत्न सुरूच आहेत. त्यामुळे भारतीय जवानांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भारतीय जवानांनी पँगाँग परिसरातील नॉर्थ फिंगर फोरवर पुन्हा कब्जा केला आहे. जूननंतर पहिल्यांदाच हा संपूर्ण परिसर पूर्णपणे भारतीय सैन्याच्या नियंत्रणाखाली आला आहे. नॉर्थ फिंगर फोर पोस्टपासून ईस्ट फिंगर फोर पोस्ट काही मीटर अंतरावर आहे. या ठिकाणी चिनी सैन्यानं ठाण मांडलं आहे.मोदी सरकारचा मोठा निर्णय; पबजीसह ११८ मोबाईल अ‍ॅप्सवर बंदीभारताचा चीनवर डिजिटल स्ट्राइकपबजीसह ११८ मोबाईल ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. याआधी मोदी सरकारनं जवळपास १०० हून अधिक मोबाईल अधिक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता आणखी ११८ अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं घेतला आहे.पबजीसह कॅमकार्ड, बायडू, कट कट, वूव, टेन्सेंट वेयून, राईज ऑफ किंग्डम्ज, झॅकझॅक यांच्यासह अनेक अ‍ॅप्सवर सरकारनं बंदी घातली आहे. देशाच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला धोका असल्यानं बंदीची कारवाई करत असल्याचं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे. 'या कारवाईमुळे कोट्यवधी भारतीय मोबाईलधारक आणि इंटरनेट वापरकर्त्यांच्या हितांचं संरक्षण होईल. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे,' असं मंत्रालयानं निवेदनात म्हटलं आहे.

टॅग्स :manoj naravaneमनोज नरवणेindia china faceoffभारत-चीन तणावladakhलडाख