शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: LACवरील कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यास हवाई दल योग्य जागी तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 06:30 IST

पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य महत्त्वूपर्ण समजले जात आहे.

हैदराबाद : भारत-चीन सीमेवरील वास्तविक रेषेवरील (एलएसी) कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यास हवाई दल तयार आहे व योग्य जागी तैनात आहे, असे सूचक विधान हवाईदल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी केले आहे. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य महत्त्वूपर्ण समजले जात आहे.दुंडीगलमध्ये हवाईदल अकादमीमध्ये कम्बाईन्ड ग्रॅज्युएशन परेडला (सीजीपी) संबोधित करताना त्यांनी म्हटले आहे की, भारतीय हवाई दल चीनच्या हवाई दलाची क्षमता, त्यांची विमानतळे, संचलनात्मक तळ व भागातील त्यांची तैनाती याबाबत पूर्ण अवगत आहे. कोणत्याही आकस्मिक स्थितीशी निपटण्यासाठी आम्ही तयार आहोत. ते म्हणाले की, जगात शांतता नांदवी, यासाठी आम्ही आग्रही आहोत. एलएसीवरील तणाव शांततेने निवळावा, यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र, त्याचवेळी कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यास सक्षम आहोत.आमच्या सुरक्षेसाठी आम्ही सशस्त्र दलांना हरघडी तयार राहण्यास सांगितले आहे. गलवान खोऱ्यातील स्थिती म्हणजे जगाला हा छोटासा नजारा दिसला आहे की अगदी कमी कालावधीत आम्ही काय करू शकतो, असेही ते म्हणाले.>हवाई दल लक्ष्य पूर्ण करण्यासाठी संकल्पित आहे व लडाखच्या गलवान खोºयातील आमच्या शूरवीरांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत