शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

India China Face Off: पंतप्रधान, संरक्षणमंत्री गप्प का?-काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 06:52 IST

भारताचे जवान शहीद; विरोधकांचं मोदी सरकारवर टीकास्त्र

नवी दिल्ली : चीनच्या सैन्याकडून लडाखमधील तीन ठिकाणी घुसखोरी करण्यात आल्याने संपूर्ण चिंतित आहे. परंतु चीनच्या या चुकीच्या पाऊलाबाबत मोदी सरकारने मात्र मौन बाळगले असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. चीनी सैनिकांकडून लडाखमधील गलवान नदीचे खोरे, हॉट स्पिंग आणि पेंगोंग सरोवर या परिसरात घुसखोरी केल्याच्या वृत्तानंतर सुरजेवाला यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले की, भारताची भौगोलिक सुरक्षा आणि एकता याबाबत समझोता केला जाऊ शकत नाही. परंतु आलेल्या बातम्यांवरून चीनने गलवान नदीचे खोरे, हॉट स्पिंग आणि पेंगोंग सरोवर या परिसरात अतिक्रमण केल्याचे दिसत आहे. मागील पाच दशकांत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ एकही दुर्घटना घडलेली नाही. भारताचा एकही सैनिक भारत-चीन सीमेवर शहीद झालेला नाही. पण आता भारताचा एक अधिकारी आणि दोन सैनिक शहीद झालेआहेत.आपले सैनिक सैनिक शहीद होणे ही बाब गंभीर आणि अस्वीकारार्ह आहे. संपूर्ण देश चिडलेला असताना पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग मात्र गप्प बसले आहेत. या घटनेबाबत पंतप्रधानांनी देशासमोर उत्तर दिले पाहिजे. आपले सैनिक शहीद झाले असतील किंवा जखमी झाले असतील तर हे खरे आहे का हे जनतेला सांगितले पाहिजे. पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री यावर गप्प का बसले आहेत, असेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे.जनतेसमोर नेमके चित्र मांडले पाहिजे - एच. डी. देवेगौडामाजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा म्हणाले की, चीनची घुसखोरी चिंताजनक आहे. सीमेवरून येणाऱ्या बातम्या विचलित करणाºया आहेत. सीमेवर त्या ठिकाणी नेमके काय घडले आहे याचे चित्र देशासमोर स्पष्टपणे मांडले गेले पाहिजे.ठोस उत्तर देण्याची वेळ - कॅप्टन अमरिंदर सिंगचीनच्या या कृत्याबाबत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, देशाचे रक्षण करताना दररोज आमच्या सैनिकांचे बळी जावेत इतके त्यांचे आयुष्य स्वस्त नाही. चीनची सतत आक्रमण करण्याची वृत्ती आणि आपल्या प्रादेशिक अधिकाराचे उघडउघड केलेले उल्लंघन या विरोधात भारताने आता उत्तर देण्याची वेळ आली आहे....मग मरेपर्यंत मारहाण केली काय? - ओेमर अब्दुल्लानॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला म्हणाले की, तणावाच्या स्थितीत दोन्ही देशांकडून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच चीनकडून भारताच्या तीन जवानांना गोळ््या घातल्या जात असतील तर ही स्थिती किती गंभीर आहे हे लक्षात घ्यावे. अब्दुल्ला यांच्या टिप्पणीवर एका युजरने गलवान भागात सैन्याकडून गोळीबार झाला नसल्याचे लक्षात आणून देताच अब्दुल्ला यांनी प्रतिप्रश्न केला आहे की, याचा अर्थ त्यांना मरेपर्यंत मारहाण करण्यात आली की काय? मग हे तर आणखी भयानक आहे.तामिळनाडूची शहीद जवानाच्या कुटुंबीयांना २० लाखांची मदतया हल्ल्यात शहीद झालेले एक सैनिक के. पलानी मूळचे तामिळनाडूतील रामनाथपुरम जिल्ह्याच्या कडूक्कलूर गावातील आहेत.मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी या सैनिकाच्या कुटुंबीयांना २० लाखांची मदत जाहीर केली आहे. अण्णा डीमके आणि विरोधी पक्ष डीएमके या दोघांनाही शहीद अधिकारी आणि दोन जवानांना आदरांजली वाहिली.एमडीएमकेचे महासचिव वायको यांनी आरोप केला की, जगभर कोरोना विषाणूचा प्रसाराला कारणीभूत ठरल्याने टीकेचा धनी ठरलेल्या चीनने हे कृत्य जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी उचलले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajnath Singhराजनाथ सिंहcongressकाँग्रेस