शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
3
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
4
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
5
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
6
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
7
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
8
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
9
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
10
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
11
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
12
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
13
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
14
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
15
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
16
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
17
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
18
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
19
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
20
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा

India China Face Off: 'हे' तीन बलाढ्य देश भारताच्या ठामपणे पाठिशी; चीन पडला एकाकी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 6:25 AM

आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत मात : लद्दाखमध्ये भारतीय लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स लढाईसाठी झाली सज्ज

- टेकचंद सोनवणेनवी दिल्ली : गलवान खोऱ्यातील वाद अद्याप संपला नसला तरी आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत भारतानेचीनवर मात केली आहे. गेल्या पाच दिवसांपासून भारत करीत असलेल्या राजनैतिक चर्चेला यश आले. फ्रान्स, अमेरिका व जर्मनीने भारताची पाठराखण करीत चिनी ड्रॅगनला अप्रत्यक्ष इशारा दिला. तर चीनचे मित्रराष्ट्र असलेल्या रशियाने या प्रकरणी संयमी प्रतिक्रिया दिली. शेजारी राष्ट्रामध्ये श्रीलंका, बांगलादेश, भूतान, म्यानमारकडून अद्याप प्रतिक्रिया उमटलेली नाही.सलग तिसºया दिवशीही गलवान खोºयात झटापट झाली त्याच ठिकाणी दोन्ही देशांच्या समकक्ष लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा झाली. एकीकडे चर्चेची तयारी दाखवून गलवानमध्ये नदीचा प्रहाव बदलण्यासाठी चीनने बुलडोझरसारखी यंत्रे आणली. चीनकडून लष्करी हालचाली वाढत असल्या तरी शुक्रवारी लेह, लद्दाखमध्ये आकाशात भारतीय लढाऊ हेलिकॉप्टर्सनी सीमा सुरक्षेची ग्वाही देशवासीयांना दिली. लष्कर स्तरावरील तीन दिवसांपासून सुरू असलेली चर्चा अजून काही दिवस चालणार असल्याने तूर्त तोडगा निघालेला नाही.डोकलाम प्रमाणे 'जैसे थे' स्थितीवर भारत ठाम असल्याने चीनचा आक्रमकपणा बीजिंगमध्ये परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत आजही उमटला. सोमवारी झालेल्या झटापटीत १० भारतीय जवान चीनच्या ताब्यात असल्याचे वृत्त पसरले होते. हे जवान गुरूवारी भारतीय हद्दीत परतल्याचेही वृत्तात म्हटले होते. भारतीय लष्कराने हे वृत्त फेटाळले तर चिनी परराष्ट्र मंत्रालयानेदेखील 'आमच्या ताब्यात भारतीय सैनिक नव्हते' असे स्पष्टीकरण दिले. आपल्या जखमी, मृत जवानांचा आकडा मात्र चीन सरकारने आजही दिला नाही.सर्व क्षेत्रात कोंडीतंत्रज्ञान, बांधकाम, दूरसंचार क्षेत्रापाठोपाठ आता क्रीडा क्षेत्रातूनदेखील चीनविरोधात प्रतिक्रिया उमटली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय खेळांडूंच्या किटचे प्रायोजक असलेली चिनी कंपनी लि निंगसमवेतचा करार रद्द करण्यासाठी कार्यकारी मंडळाचीबैठक बोलावणार असल्याची माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे कोषाध्यक्ष आनंदेश्वर पांडे यांनी दिली. चीनविरोधी भावना देशात दिवसेंदिवस प्रबळ होत आहे.स्व-रक्षणासाठी सिद्धकोणत्याही संकटासाठी भारतीय हवाई दलाने तयारी सुरू केली आहे. लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर सज्ज आहेत.गेल्या दोन दिवस हवाई दलाचे प्रमुख आर.के.एस. भदोरिया यांनी लेह व श्रीनगरचा दौरा केला. १५ जूनला झालेल्या झटापटीनंतर भारतीय लष्करास सतर्कतेचा इशारा दिला आहे. लद्दाखमध्ये जवानांची संख्या वाढवण्यात आली आहे.चीनचा युद्धज्वर आभासी असला व चर्चा सुरू असली तरी स्व-रक्षणासाठी सिद्ध आहोत, अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ लष्करी अधिकाºयाने दिली.पुलवामात ८ दहशतवाद्यांचा खात्मा; पाकिस्तानचे मनसुबे उद्ध्वस्त केलेचीनच्या आक्रमकपणास भारताने जशास तसे उत्तर दिल्यानंतरही काश्मीर सीमेवर पाकिस्तानने नियंत्रण रेषेचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला. राजोरी जिल्ह्यात सकाळी पावणे अकरा वाजता पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला.भारतीय जवानांनी तत्काळ उत्तर दिले. गोळीबार करून काही दहशतवाद्यांना भारतात प्रवेशासाठी मोकळा मार्ग करून देण्याचे पाकिस्तानचे मनसूबे जवानांनी उध्वस्त केले.मात्र या चकमकीचा संदर्भ गलवान खोºयाशी नसल्याचे स्पष्टीकरणलष्कराने दिले. शुक्रवारी ८दहशतवाद्यांना पुलमावात भारतीय जवानांनी ठार मारले. एका मशिदीत ते लपले होते.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतFranceफ्रान्सrussiaरशियाAmericaअमेरिका