शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आधी भारतविरोधी घोषणाबाजी, आता चीन-पाकविरोधात रॅली; 'त्या' घटनेनं पालटली काश्मीरमधील परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 14:48 IST

काश्मीरमधील परिस्थिती बदलली; स्थानिकांनी काढली तिरंगा रॅली

ठळक मुद्देकाश्मीरमधील परिस्थितीत मोठा बदल; स्थानिकांची तिरंगा रॅलीतिरंगा रॅलीत तरुणांची संख्या मोठी; पाकिस्तान, चीनविरोधात घोषणाबाजीचिनी मालावर बहिष्कार घालण्याचं आवाहन

श्रीनगर: चीनसोबतचे आधीच ताणले गेलेले संबंध विकोपाला गेल्यानं देशातील परिस्थिती बदलताना पाहायला मिळते आहे. याचं प्रतिबिंब काश्मीरमध्येही दिसू लागलं आहे. काश्मीरमध्ये बऱ्याचदा भारताविरोधात घोषणाबाजी व्हायची. मात्र आता परिस्थिती बदलू लागली आहे. उत्तर काश्मीरमध्ये असलेल्या कुपवाडामध्ये आता पाकिस्तान आणि चीनविरोधात घोषणाबाजी सुरू झाली आहे. कुपवाडा नियंत्रण रेषेजवळ येत असल्यानं ही घटना महत्त्वाची आहे. काश्मीरच्या कुपवाड्यातील नागरिकांनी हाती तिरंगा घेऊन चीनविरोधात रॅली काढली. यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण सहभागी झाले होते. लष्कराचं मनोबल वाढवणारी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं. त्यांनी चीनमध्ये तयार करण्यात आलेला एलईडी टीव्ही आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा पुतळा जाळून आपला संताप व्यक्त केला. स्थानिकांनी काढलेल्या तिरंगा रॅलीमध्ये भाजपाचे नेते आणि कार्यकर्तेदेखील सहभागी झाले होते. जिल्हा मुख्यालयातल्या बाजारांमधून तिरंगा रॅली पुढे गेली. यावेळी हिंदुस्तान झिंदाबादसोबतच चीन-पाकिस्तानविरोधी घोषणाही देण्यात आल्या. पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्यानं भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्याविरोधात या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. काश्मीरमधील परिस्थिती बदलली असल्याचं चीननं लक्षात ठेवावं. या ठिकाणी दहशतवादाला खतपाणी घालणं पाकिस्ताननं बंद करावं, अशा भावना रॅलीत सहभागी झालेल्यांनी व्यक्त केल्या.मोठी बातमी! चीन पूर्व लडाखमधून माघार घेण्यास तयार; भारताला यशभारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये १२ तास बैठक; भारतानं स्पष्ट शब्दांत सुनावलंनाद करा, पण आमचा कुठं! भारतीय जवानांनी थेट चिनी अधिकाऱ्याला उचललंचीन युद्धाच्या तयारीत?; लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत हवाई दलाच्या हालचालीजुना मित्र कामी येणार; चीनला भिडणाऱ्या भारताला 'ब्रह्मास्त्र' देणार

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरchinaचीनPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद