शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

India China Face Off: जुना मित्र कामी येणार; चीनला भिडणाऱ्या भारताला 'ब्रह्मास्त्र' देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 09:54 IST

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशिया दौऱ्यावर; एस-४०० लवकर सोपवण्याची मागणी करणार

ठळक मुद्देसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह आजपासून तीन दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावरभारत रशियाकडे एस-४०० क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा लवकर देण्याची मागणी करणारचीनसोबतचे संबंध ताणले गेल्यानं शस्त्रास्त्र सज्जता वाढवण्यावर भारताचा भर

नवी दिल्ली: लडाख सीमेवर तणाव निर्माण झाल्यामुळे भारत-चीनमधील संबंध विकोपाला गेले आहेत. भारतानं सीमावर्ती भागातील फौजफाटा वाढवला आहे. चिनी सैन्याला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराला पूर्ण मोकळीक देण्यात आली. यासोबतच आपलं सामर्थ्य वाढवण्याच्या दृष्टीनं भारतानं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. जुना मित्र असलेल्या रशियासोबत भारतानं क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा एस-४०० साठी करार केला होता. ही क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा लवकरात लवकर मिळावी यासाठी भारतानं प्रयत्न केले आहेत.२०१८ मध्ये भारतानं एस-४०० साठी रशियासोबत ५ अब्ज डॉलरचा करार केला. कोरोनाचं संकट आल्यानं एस-४०० यंत्रणा मिळण्यास विलंब होत आहे. ही यंत्रणा डिसेंबर २०२१ पर्यंत मिळण्याची शक्यता आहे. मात्र चीनसोबत निर्माण झालेला संघर्ष पाहता ही यंत्रणा लवकरात लवकर मिळवण्याच्या दृष्टीनं भारतानं प्रयत्न सुरू केले आहेत. सैन्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चीनसोबत उडालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर गेले आहेत. कोरोनाचं संकट असल्यानं सध्याच्या घडीला मंत्री परदेश दौरे टाळत आहेत. मात्र तरीही सध्या निर्माण झालेली परिस्थिती पाहता सिंह चीनसाठी रवाना होत आहेत. सिंह यांचा रशिया दौरा तीन दिवसांचा असेल. एस-४०० क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा लवकरात लवकर देण्यात यावी, असा आग्रह सिंह यांच्याकडून रशियाकडे करण्यात येणार आहे. भारतानं गेल्याच वर्षी एस-४०० साठी आगाऊ रक्कम दिली आहे. चीनच्या ताफ्यात आधीपासूनच एस-४०० यंत्रणा आहे.चीनसोबतचे संबंध ताणले गेल्यानं भारतानं अधिकाधिक शस्त्रास्त्र सज्ज होण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच एस-४०० यंत्रणा लवकरात लवकर मिळवण्यासाठी भारतानं प्रयत्न सुरू केले आहेत. रशिया भारतासोबतच आणखी काही देशांना ही यंत्रणा देणार आहे. मात्र त्यांच्या आधी ही यंत्रणाआपल्याला मिळावी, असा भारताचा प्रयत्न आहे. दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंधांचा संदर्भ देऊन एस-४०० यंत्रणा लवकर सोपवण्याची मागणी करण्यात येणार आहे. सुखोई, मिगच्या विमानांचे सुट्टे भाग मिळावेत आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांचा पुरवठा थांबू नये, अशा मागण्या रशियाकडे केल्या जाणार आहेत.

टॅग्स :Indiaभारतchinaचीनrussiaरशिया