शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

India China Face Off: चीनच्या हल्ल्यात २० जवान शहीद; भारताचंही जशास तसं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 06:24 IST

चीनचे ४३ सैनिक ठार झाल्याची शक्यता

- हरिश गुप्ता, सुरेश एस. डुग्गर जम्मू/नवी दिल्ली : भारतीय सीमेवरील गवलान खोऱ्यात चिनी सैनिकांनी सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्यात भारताच्या एका कर्नलसह तीन जवान शहीद झाले. याच हल्ल्यात भारताचे आणखी १७ जवान जखमी झाले होते. परंतु त्या परिसरात शून्याखाली असलेल्या तापमानामुळे ते वाचू न शकल्याने शहीदांची संख्या २० झाली. काही वृत्तसंस्था व वृत्तवाहिन्यांनी भारताने या कारवाईला जशास तसे उत्तर देत चीनचे ४३ सैनिक मारल्याचा दावाही केला आहे.हा तणाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि सैन्यप्रमुखांची दोनवेळा चर्चा केली.संघर्षाला चीन कारणीभूत; परराष्ट्र खात्याचा दावाभारतीय लष्कराने म्हटले आहे की, गवलान खोºयातील पॅट्रोलिंग पॉर्इंट १४ पाशी सैन्य माघारीची सुरू असताना दोन्हीकडील सैनिकांत हा संघर्ष झाला. त्यात दोन्ही बाजूचे जवान मृत वा जखमी झाले. मात्र लष्कराने भारताचे किती जवान शहीद झाले, हे स्पष्ट केलेले नाही. दोन देशांच्या सीमेवरील जैसे थे स्थिती बदलण्याचा प्रयत्न चीनने केल्यामुळे दोन्ही बाजूंच्या सैन्यांमध्ये संघर्ष झाला, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले. मात्र भारतीय लष्कर वापरराष्ट्र मंत्रालयाने आपले एकूण २० जवान शहीद झाल्याचे मान्य केले आहे. सीमेवर चीनच्या या कागाळीमुळे देशभर संतापाचे वातावरण आहे.४५ वर्षांनी पुन्हा रक्तरंजित संघर्षभारत व चीनच्या सैनिकांमध्ये सोमवारी झालेली हाणामारी हा पूर्व सीमेवर दोन्ही देशांमध्ये ४५ वर्षांनी झालेला रक्तरंजित संघर्ष होता. याआधी अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमेवर गस्त घालणाºया आसाम रायफल्सच्या गस्ती तुकडीवर चिनी सैनिकांनी गनिमी काव्याने केलेल्या हल्ल्यात भारताचे चार जवान शहीद झाले होते.53 वर्षांपूर्वी सन १९६७ मध्ये सिक्किम तिबेट सीमेवर नाथू ला खिंड व चो ला येथे दोन्ही सैन्यांमध्ये झालेली चक्क तुंबळ लढाई झाली होती.88 भारतीय जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. पण त्याच्या बदल्यात ३४० चिनी सैनिकांचा खात्मा केला होता.दोन्ही देशांचे मिळून सुमारे एक हजार जवान जखमीही झाले होते.1962च्या युद्धानंतरचा भारत व चीन यांच्यातील तो सर्वात भीषण संघर्ष होता.भारतीय सैनिकांनीच हल्ला केल्याचा चीनचा कांगावाभारतीय सैनिकांनी चिथावणी देऊन हल्ला केल्यामुळेच हे घडल्याचा कांगावा चीनने केला आहे. चीनचे प्रवक्त म्हणाले की, वरिष्ठ पातळीवर बैठक होऊन सीमेवरील तणाव कमी करण्यावर सहमती झाली होती. मात्र १५ जून रोजी भारतीय सैन्याने बेकायदा कृत्यांसाठी दोन वेळा सीमेचे उल्लंघन केले.चीनचा हा कांगावा अजिबात न पटणारा आहे. एकीकडे चीनमुळे जगभर कोरोनाचे विषाणू पसरले असताना, आता त्यावरून जगाचे लक्ष उडावे, यासाठीच चीनने या कागाळ्या सुरू केल्या आहेत.चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी भारतात होत असतानाच नेमके चीनने हे केले आहे.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन