शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

India-China Border Clash: तवांग चकमकीमुळे चिंतित, आंतरराष्ट्रीय सीमांवर कधीच उल्लंघन व्हायला नको; जर्मन राजदूत स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 15:33 IST

तवांग चकमकीसंदर्भात बोलताना एकरमन म्हणाले, संघर्षाबाबत ते म्हणाले, यासंदर्भात माझ्याकडे पूर्ण माहिती नाही. पण आम्हाला चिंता वाटते.

अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमधील झाली चकमक ही चिंतेची बाब आहे. आंतरराष्ट्रीय सीमांचे उल्लंघन केले जाऊ नये, असे जर्मनीचे राजदूत फिलिप एकरमन यांनी म्हटले आहे. एका एका मुलाखती दरम्यान बोलत होते..

आपण चीनवर अधिक अवलंबून - जर्मनीभारत आणि युरोपीय युनियन यांच्यातील मुक्त व्यापार कारारासंदर्भात एकरमन यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, जर्मनीला हा एफटीए हवा आहे. यामुळे, आमचा भारतसोबतचा व्यापार पूर्णपणे बदलेल. सध्या आम्ही चीनवर अधिक अवलंबून आहोत. आम्हाला इतर देशांसोबतही व्यापार वाढवा लागेल. दूर्दैवाने, आमच्या प्राधान्य क्रमात भारत तेवढ्या वरच्या पातळीवर नाही, जेवढे त्याने असायला हवे. 

याच बरोबर लोकसंख्या आणि इतर काही कंगोऱ्यांचा विचार केल्यास, भारताशिवाय कुठलाही देश चीनचा सामना करू शकत नाही. लोक अजूनही व्हिएतनाम आणि मलेशियाकडे बघतात. त्यांचा दृष्टीकोन असा का आहे, हे मला माहीत नाही. कदाचित भारतातील संरक्षणवादी वातावरण आणि रेग्युलेशन्सची समस्या हे यामागील कारण असू शकते, असेही एकरमन म्हणाले.

तवांग चकमकीमुळे चिंतित -तवांग चकमकीसंदर्भात बोलताना एकरमन म्हणाले, यासंदर्भात माझ्याकडे पूर्ण माहिती नाही. पण आम्हाला चिंता वाटते. आंतरराष्ट्रीय सीमांवर कधीच उल्लंघन व्हायला नको. ते म्हणाले, इतर गोष्टींबरोबरच जेव्हा एनर्जी दराचा विषय येतो, निर्वासितांचा प्रश्न येतो. जेव्हा रशियाचा सामना करण्याची वेळ येते, तेव्हा आम्ही युरोपात रशियाच्या या आक्रमकतेकडे युद्धाच्या स्वरुपात पाहतो. 

एकरमन म्हणाले, आपल्याकडे तवांग चकमकीसंदर्भात पूर्ण माहिती नाही. मात्र तेथे हिंसाचार होत आहे. आतापर्यंत पाश्चिमात्य देशांमध्ये हिंसाचार होत होता. पण आता तो पूर्वेकडील देशांमध्येही होऊ लागला आहे. हा चिंतेचा विषय आहे. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावchinaचीनGermanyजर्मनीSoldierसैनिक