लखनौ : पाकिस्तानचे अस्तित्व कायम राखण्यासाठी गरज भासल्यास आम्ही अण्वस्त्रांचा वापर करू, अशी वल्गना करणारे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांना गुरुवारी भारताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ठोस प्रत्युत्तर दिले. आपल्या सीमेचे रक्षण करण्यासाठी भारत सक्षम असल्याचे पर्रीकर म्हणाले.येथील छावणी बोर्डाच्या नवनियुक्त सदस्यांच्या कार्यक्रमादरम्यान पर्रीकर पत्रकारांशी बोलत होते. भारत दहशतवादाला समर्थन देत असून, पाकिस्तानविरोधात भारताचे हे छुपे युद्ध आहे, असा आरोप ख्वाजा असिफ यांनी बुधवारी केला होता. शिवाय वेळ आलीच तर अण्वस्त्रांचा वापर करण्यास पाकिस्तान मागे-पुढे पाहणार नाही, असा गर्भित इशाराही दिला होता. असिफ यांच्या या वक्तव्याबाबत छेडले असता पर्रीकरांनी, भारत प्रत्येक संकट निपटण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. ‘त्यांच्यासाठी’ लवकरच शुभवार्ता‘वन रँक, वन पेन्शन’च्या मागणीसाठी देशभर निदर्शने करणाऱ्या माजी लष्करी अधिकारी व सैनिकांना लवकरच शुभवार्ता मिळेल, असे संकेत पर्रीकर यांनी दिले. (वृत्तसंस्था)
‘सीमेचे रक्षण करण्यास भारत सक्षम’
By admin | Updated: July 10, 2015 01:28 IST