शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या टॅरिफ वॉरमुळे भारत-कॅनडा जवळ येणार? खलिस्तान मु्द्द्यावर झालेला वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 22:02 IST

अमेरिकेच्या नवीन व्यापार धोरणामुळे भारत आणि कॅनडा, दोघांना फटका बसणार आहे.

Donald Trump Tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताच भारतासह अनेक देशांवर परस्पर शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे. येत्या 2 एप्रिल 2025 पासून हे परस्पर शुल्क लागू केले जाणार आहे. दरम्यान, घोषणेमुळे भारत आणि कॅनडामधील बिघडलेले संबंध पुर्ववत होत आहेत. याचे कारण म्हणजे, अमेरिकेच्या घोषणेमुळे भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांना आर्थिक धक्का बसू शकतो. यामुळेच दोन्ही देशांनी व्यापार सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

खलिस्तानी मुद्द्यांवर झालेला वाद...2023 मध्ये माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येचा आरोप केल्यावर भारत-कॅनडाच्या संबंधात तणाव निर्माण झाला होता. यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. आता नवे पंतप्रधान मार्क कार्नी सत्तेवर आल्यानंतर कॅनडा भारतासोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.

यूएस टॅरिफशी एकत्रितपणे सामना करणारडोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन शुल्क धोरणामुळे भारत आणि कॅनडा, या दोन्ही देशांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, भारत आणि कॅनडा आपले मतभेद बाजूला ठेवून अमेरिकन टॅरिफचा प्रभाव कमी करण्यासाठी धोरण आखत आहेत. कॅनडाच्या अधिकाऱ्यांच्या मते भारतासोबत चांगले व्यापारी संबंध हे कॅनडाचे प्राधान्य आहे. 

या आरोपामुळे तणाव वाढणार? मात्र, भारत आणि कॅनडामधील संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांदरम्यान कॅनडाने नवे वादग्रस्त विधान केले आहे. भारत कॅनडाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करू शकतो, असा दावा कॅनडाच्या एका गुप्तचर अधिकाऱ्याने केला. या विधानामुळे दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा वाढू शकतो. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे भारत आणि कॅनडामधील व्यापारी संबंध मजबूत होऊ शकतात, पण खलिस्तानी मुद्द्यामुळे आणि राजकीय आरोपांमुळे ही मैत्री किती काळ टिकेल हे पाहणे महत्वाचे आहे. 

टॅग्स :IndiaभारतCanadaकॅनडाAmericaअमेरिका