भारत करणार पाकिस्तानमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रावर हल्ला

By Admin | Updated: September 22, 2016 19:41 IST2016-09-22T19:41:12+5:302016-09-22T19:41:12+5:30

उरी दहशतवादी हल्ल्याचा बदल घेण्यासाठी भारत पाकिस्तानवर हल्ला करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे

India to attack terrorist training center in Pakistan | भारत करणार पाकिस्तानमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रावर हल्ला

भारत करणार पाकिस्तानमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रावर हल्ला

>सुरेश डुग्गर / ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 22 - उरी दहशतवादी हल्ल्याचा बदल घेण्यासाठी भारत पाकिस्तानवर हल्ला करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.. या हल्ल्यात फक्त दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांना टार्गेट केलं जाणार आहे. भारत बदला घेण्यासाठी नक्कीच हल्ला करणार याची भीती पाकिस्तानला असल्याने सीमारेषेवरील जवानांची गस्त वाढवण्यात आली आहे. 
 
संरक्षण खात्याच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताने सीमारेषेवर सुरु केलेली तयारी युद्धासाठी नसून हल्ल्याचा बदला घेण्यासाठी उत्तर दिल्यानंतर पाकिस्तानकडून युद्ध छेडलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताने युद्धाचा सामना करण्यासाठी सज्ज होण्याच्या दृष्टीने तयारी करत आहे. 
 
सुत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रावर हल्ला करण्याच्या दृष्टीने भारतीय लष्कराने पुर्ण तयारी केली आहे. प्रशिक्षण केंद्रांवर हल्ला करण्यासाठी आणि त्यातून उद्भवणा-या परिणामांपासून भारताला वाचवण्यासाठी लष्कराने 20 ते 30 दिवसांचा वेळ मागितला असून लवकरच हा हल्ला होण्याची शक्यता असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. 
 

Web Title: India to attack terrorist training center in Pakistan