भारत आणि अमेरिका दहशतवाद्यांसंदर्भातील माहितीची करणार देवाणघेवाण
By Admin | Updated: June 2, 2016 15:47 IST2016-06-02T15:28:48+5:302016-06-02T15:47:39+5:30
दहशतवादाला आळा घालण्यासाठी भारत आणि अमेरिकेनं कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे

भारत आणि अमेरिका दहशतवाद्यांसंदर्भातील माहितीची करणार देवाणघेवाण
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2- जगभरात दिवसेंदिवस दहशतवाद्यांच्या कुरापती वाढत आहेत. दहशतवादाला आळा घालण्यासाठी भारत आणि अमेरिकेनं कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये दहशतवाद्यांसंदर्भातील माहितीची देवाण-घेवाण करण्याचा करार झाला आहे.
भारताची सरकारी संस्था आणि अमेरिकेच्या सरकारी संस्थेमध्ये हा करार झाला आहे. या करारावर आज दोन्ही सरकारी संस्थांच्या प्रतिनिधींनी स्वाक्ष-या केल्या आहेत. भारताचे केंद्रीय गृह सचिव राजीव मेहऋषी आणि अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा या दोघांच्या उपस्थिती हा करारावर झाला आहे. डोमॅस्टिक लॉअंतर्गत करारानुसार दोन्ही देश दहशतवाद्यांसंदर्भात एकमेकांना माहिती पुरवणार आहेत. दहशतवादाचा एकत्रितरीत्या सामना करण्यासाठी दोन्ही देशांनी हातमिळवणी केली आहे.