शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
4
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
5
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
6
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
7
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
8
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
9
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
10
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
11
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
12
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
13
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
14
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
15
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
16
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
17
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
18
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
19
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
20
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?

इंडियन मुजाहिद्दीन आणि ईस्ट इंडियामध्येही "INDIA"; विरोधकांच्या आघाडीवर PM मोदींचा मोठा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 12:32 IST

मोदी म्हणाले,  केवळ "इंडिया" नाव ठेवल्यानं होत नाही. ईस्ट इंडिया कंपनीनेही "इंडिया" लावले होते आणि इंडियन मुजाहिदीनच्या नावातही "इंडिया" आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूर मुद्द्यावरून जबरदस्त संग्राम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक पार पडली. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आघाडीवर मोठा हल्ला चढवला. मोदी म्हणाले,  केवळ "इंडिया" नाव ठेवल्यानं होत नाही. ईस्ट इंडिया कंपनीनेही "इंडिया" लावले होते आणि इंडियन मुजाहिदीनच्या नावातही "इंडिया" आहे.

मोदी म्हणाले, विरोधक विखुरलेले आहेत. हताश आहेत. त्यांना आणखी बराच काळ सत्तेत येण्याची इच्छा नाही, असे त्यांचा दृष्टीकोन पाहता दिसते. यावेळी त्यांनी 15 ऑगस्टला प्रत्येक घरावर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचीही माहिती दिली. या पावसाळी अधिवेशन काळातील ही संसदीय पक्षाची पहिलीच बैठक होती. ही बैठक संसदेच्या लायब्ररी बिल्डिंगमध्ये पार पडली. 

यावेळी गृह मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते.

खरे तर, सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूरमधील घटनेवरून गदारोळ सुरू आहे. या मुद्द्यावर पंतप्रधान मोदीनी बोलावे आणि संसदेत सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधक करत आहेत. तर, गृहमंत्री अमित शाह यांच्या उत्तराने सरकार अल्पकालीन चर्चेसाठी तयार आहे. मात्र या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी बोलावे, यावर विरोधक ठाम आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसPoliticsराजकारणBJPभाजपाParliamentसंसद