शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

इंडिया आघाडी: नाही नाही म्हणत, लोकसभेच्या ४६ जागांसाठी काँग्रेस-‘आप’मध्ये समझोता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 06:23 IST

AAP-Congress Seat Sharing: दिल्ली, गुजरात, हरयाणा, गोवा आणि चंडीगडसाठी उभय पक्षांत एकमत

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘इंडिया’ आघाडीतील काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) या राष्ट्रीय पक्षांनी शनिवारी दिल्ली, गुजरात, हरयाणा, गोवा आणि चंडीगड अशा ३ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये लोकसभेच्या ४६ जागांसाठी जागावाटपाची घोषणा केली. या ४६ जागांपैकी काँग्रेस ३९, तर ‘आप’ ७ जागांवर लढणार आहे.

मात्र, पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या ‘आप’ने राज्यातील लोकसभेच्या सर्व १३ जागा एकट्याने लढविण्याचे ठरविले आहे.समझोता झालेल्या जागांवर ‘इंडिया’ आघाडीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार असून, या समझोत्याचा सन्मान काँग्रेस आणि ‘आप’चे नेते आणि कार्यकर्ते करतील, अशी ग्वाही उभय पक्षांनी कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

दिल्लीत काय घडले?nकेंद्रातील सत्ताधारी भाजपने २०१४ आणि २०१९ साली दिल्लीत लोकसभेच्या सर्व सातही जागा मोठ्या फरकाने जिंकताना २०१९ साली ५६.८६ टक्के मते मिळविली होती. काँग्रेसला २२.५१, तर ‘आप’ला १८.११ टक्के मते मिळाली होती.n‘आप’ने गोव्यातील दोन्ही जागा काँग्रेससाठी सोडल्या आहेत.गुजरातेत काय घडले?nगुजरातमध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्व २६ जागांवर वर्चस्व राखताना ६२.२१ टक्के मते मिळविली होती, तर काँग्रेसला ३२.११ टक्के मते मिळाली होती. n२०२२ साली विधानसभा निवडणुकीत प्रथमच मैदानात उतरलेल्या आम आदमी पक्षाने १२.८२ टक्के मतांसह ५ जागा जिंकल्या होत्या. 

पंजाबात ‘मैत्रीपूर्ण’ लढतपंजाबमध्ये लोकसभेच्या सर्व १३ जागा सत्ताधारी ‘आप’ लढविणार असून, येथे काँग्रेसशी ‘मैत्रीपूर्ण’ लढत होईल. पंजाबचा, तसेच ‘आप’चा प्रभाव असलेला चंडीगड मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यात आला आहे. 

चंडीगड महापालिकेमध्ये ‘आप’चे १४, तर काँग्रेसचे ८ नगरसेवक निवडून आले असून, काँग्रेस-‘आप’ आघाडीचे महापौर कुलदीपकुमार यांच्या निवडीवर नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. 

पंजाबमध्ये काँग्रेस आणि ‘आप’ वेगवेगळे का लढणार, यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी भाष्य टाळले. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने पंजाबमध्ये १३ पैकी ८ जागा जिंकल्या होत्या. अकाली दल, भाजपने प्रत्येकी दोन, तर ‘आप’ने एका जागेवर विजय मिळविला होता. मात्र, त्यानंतर २०२२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने ऐतिहासिक बहुमत संपादन केले.

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीAAPआपcongressकाँग्रेसArvind Kejriwalअरविंद केजरीवाल