शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 13:21 IST

INDIA Alliance: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज इंडिया आघाडीतील सर्व पक्षप्रमुखांसाठी खास जेवणाचे आयोजन केले आहे.

INDIA Alliance: केंद्रातील भाजप सरकारचा पराभव करण्यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्व विरोधी पक्षांनी मिळून INDIA आघाडीची स्थापना केली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीतील परभवानंतर या आघाडीत हळुहळू फूट पडत गेली. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष याच थंड पडलेल्या इंडिया आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर खासदार राहुल गांधी यांनी नवी दिल्ली येथे इंडिया आघाडीतील सर्व पक्षांच्या प्रमुखांसाठी खास जेवणाचे आयोजन केले आहे. 

बिहारमध्ये सुरू असलेल्या नवीन मतदार यादीच्या (SIR) प्रक्रियेमुळे संसदेचे कामकाज एक दिवसही चालू शकले नाही. विरोधी पक्षांचे खासदार याबाबत संसदेत सतत गोंधळ घालत आहेत. आता याच SIR च्या मुद्द्यावरुन विरोधी पक्ष पुन्हा एकवटताना दिसत आहेत. बऱ्याच काळानंतर इंडिया आघाडीने काल बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर आता आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्व पक्ष प्रमुखांना रात्रीच्या जेवणाचे निमंत्रण दिले आहे. राहुल गांधींकडून या इंडिया आघाडीमध्ये जीव ओतण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अनेक विरोधी पक्ष एकवटलेSIR च्या निषेधार्थ काँग्रेसच्या नेतृत्वाखाली काल बुधवारी पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती, ज्यामध्ये विरोधी पक्षांचे अनेक नेते सहभागी झाले होते. यामध्ये आम आदमी पार्टी (आप), तृणमूल काँग्रेस (टीएमसी), राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), द्रविड मुन्नेत्र कळघम द्रमुक, शिवसेना (यूबीटी), समाजवादी पार्टी (सपा), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीएम), सीपीआय, क्रांतिकारी समाजवादी पक्ष (आरएसपी), इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी) या पक्षांचा समावेश होता.

भारत आघाडी एक वर्षापासून निष्क्रिय इंडिया आघाडीचे प्रमुख नेते आज राहुल गांधींच्या निवासस्थानी जेवणासाठी भेटतील. उद्या म्हणजेच शुक्रवारी ते दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर संयुक्त मोर्चाही काढणार आहेत. आघाडी एकत्र करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाला हे समजले आहे की, विरोधी पक्षांना फक्त अशाच मुद्द्यांवर एकत्र आणता येते, जे त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहेत. अशा परिस्थितीत, SIR चा मुद्दा हा असा आहे, ज्याची सर्व विरोधी पक्षांना चिंता आहे. या मुद्द्यावर इंडिया आघाडी पुन्हा एकत्र येऊ शकते.

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा