शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
4
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
5
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
6
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
7
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
8
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
9
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
10
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
11
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
12
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
13
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
14
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
15
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
16
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
17
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
18
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
19
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
20
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...

'काँग्रेस-TMC मध्ये जागावाटपावर चर्चा सुरू, लवकरच तोडगा निघेल', राहुल गांधींचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 16:08 IST

INDIA Alliance Congress-TMC: ममता बॅनर्जी यांच्या स्वबळाच्या घोषणेवर राहुल गांधींची महत्वाची प्रतिक्रिया आली आहे.

INDIA Alliance Congress-TMC: लोकसभा निवडणुकीला काही महिने उरले आहेत. एकीकडे भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, तर दुसरीकडे विरोधकांच्या INDIA आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमारांनी साथ सोडल्यानंतर ममता बॅनर्जीदेखीलइंडिया आघाडी सोडणार असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधी यांचे महत्वाची प्रतिक्रिया समोर आले आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेसह पश्चिम बंगालमध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी तरुणांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तरुणांशी संवाद साधताना एका तरुणाने त्यांना प्रश्न केला की, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पक्ष इंडिया आघाडीत आहे. पण, आता त्या आघाडीतून वेगळ्या होताना दिसत आहे. ममतांना एवढे प्राधान्य का दिले जात आहे?

याला उत्तर देताना राहुल म्हणतात, 'आमची इंडिया आघाडी आहे. ममता बॅनर्जी किंवा आम्ही इंडिया आघाडी तोडलेली नाही. ममताजी आघाडीत असल्याचे सांगत आहेत. आम्हीदेखील आघाडीतच आहोत. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू आहे, यावर लवकरच तोडगा निघेल.' राहुल यांच्या या वक्तव्यावरुन काँग्रेस-तृणमूलमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?ममता बॅनर्जी यांनी गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमध्ये एकट्याने निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. पण, राष्ट्रीय स्तरावर त्यांचा पक्ष टीएमसी इंडिया आघाडीचा एक भाग राहील. डावे पक्ष इंडिया आघाडीचा अजेंडा हायजॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ममता यांनी केला. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे, तर पंजाबमध्येही आम आदमी पार्टीने स्वबळाचा नारा दिला आहे. अशा परिस्थितीत इंडिया आघाडीची वाट अवघड दिसत आहे. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीtmcठाणे महापालिकाcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाRahul Gandhiराहुल गांधीMamata Banerjeeममता बॅनर्जी