शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

भारताकडून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य वेळेपूर्वीच साध्य; नरेंद्र मोदी यांची ‘माती वाचवा’ अभियानात माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 05:44 IST

PM Modi attends programme on Save Soil Movement : सद्गुरू योगी वासुदेव यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘माती वाचवा’अभियानाअंतर्गत आज विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण संरक्षणासाठी व कार्बन उत्सर्जनाच्याविरोधात भारत करीत असलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली.

नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये इथेनॉलचे १० टक्क्यांपर्यंत मिश्रण करण्याचे लक्ष्य भारताने निर्धारित वेळेच्या पाच महिने आधीच साध्य केले आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत दिली.

सद्गुरू योगी वासुदेव यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘माती वाचवा’अभियानाअंतर्गत आज विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण संरक्षणासाठी व कार्बन उत्सर्जनाच्याविरोधात भारत करीत असलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पेट्रोलमध्ये १० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रण लक्ष्य केंद्र सरकारने ठरविले होते. ते निश्चित कालमर्यादेच्या ५ महिने अगोदरच गाठल्याचे माेदी म्हणाले. 

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी भारत गेल्या आठ वर्षांपासून विविध पावले उचलत असल्याचे सांगून ते म्हणाले, मृदा आरोग्य कार्ड, नमामि गंगे, सेंद्रिय शेतीच्या प्रयोगातून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काम केले जात आहे. विकसित देश कार्बन उत्सर्जनात आघाडीवर असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. भारत २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जन मुक्त देश होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्बन उत्सर्जनात मोठी घटइथेनॉलचे प्रमाण वाढविल्यामुळे कार्बन उत्सर्जनात २७ लाख टन एवढी घट झाली आहे. तसेच ४१ हजार कोटी रुपयांचे विदेशी चलन वाचले आहे. शेतकऱ्यांना ४० हजार कोटी रुपयांचे अधिक उत्पन्न होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

‘रासायनिक खतांचा वापर टाळणे धोक्याचे ठरेल...’

- शेतकऱ्यांनी रासायनिक खते व औषधींचा वापर टाळल्यास शेतीच्या उत्पादनावर परिणाम होईल. यामुळे समर्थ पर्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांना रासायनिक शेतीपासून दूर करु नये, असे स्पष्ट मत सद्गुरू वासुदेव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.- सद्गुरू वासुदेव म्हणाले, की रासायनिक खतांमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले, हे सत्य आहे. हरित क्रांतीमुळे शेतकऱ्यांचे प्रति एकर उत्पादन वाढले आहे, हे नाकारता येणार नाही. - रासायनिक खते व औषधींना पर्याय द्यावा लागेल किंवा शेतकऱ्यांना पुरेशी सबसिडी द्यावी लागेल, त्यानंतर रासायनिक खतांच्या वापरावर प्रतिबंध लावण्याचा विचार करता येईल, अन्यथा देशात अन्नधान्याचा तुटवडा पडेल, असा इशारा त्यांनी दिला.

भारतात तीव्रता अधिकभारत व जगातील इतर देशांमध्ये पर्यावरणाचे प्रश्नच जवळपास सारखेच असले तरी त्यांची तीव्रता भारतात अधिक आहे. भारताची लोकसंख्या जगाच्या १७ टक्के आहे; परंतु भूप्रदेश जगाच्या केवळ चार टक्के एवढाच आहे. लोकसंख्या व भूप्रदेशाच्या प्रमाणामुळे इतर देशांमध्ये समस्यांची तीव्रता निश्चितपणे कमी असल्याचे सद्गुरू वासुदेव यांनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीenvironmentपर्यावरण