शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
2
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
3
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
4
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी;अनेकांची गेली दृष्टी,७ जणांची मृत्यूशी झुंज
5
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
6
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
7
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
8
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
9
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
10
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
11
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
12
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
13
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
14
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
15
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
16
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
17
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
18
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
19
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
20
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
Daily Top 2Weekly Top 5

इराण युद्ध थंडावले अन् भारताने संधी साधली! २५ दिवसांवरून तेलसाठा ६० दिवसांवर नेला; आयात शुल्कातही कपात! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 16:20 IST

India Iran War Impact: इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ६० दिवसांचा तेलसाठा असल्याची घोषणा केली आहे. तसेच आयात शुल्कात कपात आणि निर्यातदारांना १००% विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर.

नवी दिल्ली : इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील जनतेला आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. "भारताकडे पुढील ६० दिवसांचा तेलसाठा उपलब्ध असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही," असे सरकारने स्पष्ट केले आहे. गुरुवारी विविध मंत्रालयांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत इंधन पुरवठा आणि निर्यातीबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले.

इराण युद्धानंतर समोर आलेल्या रिपोर्टमध्ये भारताकडील तेलसाठा हा २५ दिवस पुरेल एवढाच होता. परंतू, इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याने भारताने अमेरिका, रशियासह इतर देशांकडून कच्चे तेल मागविण्यास सुरुवात केली होती. सुमारे ४२ देशांकडून एलपीजीसह तेल आणण्यात येत होते. अशातच काल इराणकडूनही कच्चे तेल पाठविण्यात आले. या प्रयत्नांमुळे भारताकडे आता ६० दिवस म्हणजेच दोन महिने पुरेल एवढा तेलसाठा निर्माण झाला आहे. 

पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील आयात शुल्क घटवलेयुद्धामुळे आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून जहाजांना लांबच्या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. याचा फटका बसू नये म्हणून सरकारने पेट्रोकेमिकल क्षेत्रातील अनेक उत्पादनांवरील आयात शुल्क पुढील ३ महिन्यांसाठी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उद्योगांना कच्चा माल स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे.

निर्यातदारांसाठी १००% विमा कवचयुद्धजन्य परिस्थितीत निर्यातदारांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने ECGC कव्हरमध्ये मोठी वाढ केली आहे. सामान्यतः ८०-८५% असणारे विमा कवच आता १००% करण्यात आले आहे. विम्याचा हप्ता वाढवला जाणार नाही, उलट वाढीव विम्याचा अतिरिक्त खर्च सरकार स्वतः उचलणार आहे. या भागातून होणाऱ्या एकूण ५६% निर्यातीवर युद्धाचा परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घेऊन सरकारने हे पाऊल उचलले आहे.

मिरांडा हाऊस वादावर स्पष्टीकरणसोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका क्लिपबाबत सरकारने खुलासा केला की, मिरांडा हाऊस कॉलेजमधील आंदोलन एलपीजी टंचाईमुळे नव्हते, तर अन्नाच्या दर्जाबाबत होते. सध्या देशातील सर्व रिटेल आऊटलेट्स सुरळीत सुरू असून व्यावसायिक पुरवठा ७०% पर्यंत पूर्ववत करण्यात आला आहे.

टॅग्स :Oil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्पFuel Crisisइंधन टंचाई