स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे विधेयक लोकसभेत
By Admin | Updated: December 13, 2014 02:05 IST2014-12-13T02:05:01+5:302014-12-13T02:05:01+5:30
स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारे अशासकीय विधेयक शुक्रवारी लोकसभेत गडचिरोलीचे भाजपा खासदार अशोक नेते यांनी मांडले.

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे विधेयक लोकसभेत
नवी दिल्ली : स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारे अशासकीय विधेयक शुक्रवारी लोकसभेत गडचिरोलीचे भाजपा खासदार अशोक नेते यांनी मांडले. नागपूर व अमरावती विभागातील अकरा जिल्ह्यांना विदर्भ समजून तो भाग महाराष्ट्रापासून वेगळा करण्यात यावा, असे त्यांनी म्हटले आहे. विधेयक लोकसभेत दाखल करून घेण्यात आले.
खा. नेते यांनी आपल्या मागणीच्या समर्थनार्थ 1918 पासूनच्या सर्व नोंदी, विविध समित्यांचे अहवाल, आयोगाचे निष्कर्ष जोडले आहेत. त्यांनी आणखी तीन विधेयके सादर केली आहेत. नोकरी लागेर्पयत दरमहा दोन हजार रूपये बेरोजगारी भत्ता द्यावा, 198क्चा वनकायदा शिथिल करा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना ‘भारतरत्न’ किताब द्या, या विषयांवर ही विधेयके आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना ‘भारतरत्न’ किताब देण्याबाबत आपण आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)