सोनवडीच्या सेवालालनगरला स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा
By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:24+5:302015-03-14T23:45:24+5:30

सोनवडीच्या सेवालालनगरला स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा
>दौंड : सोनवडी (ता. दौंड) येथील सेवालालनगराचे स्वतंत्र महसुली गावात रूपांतर झाल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याकामी राष्ट्रवादी बंजारा भटक्या विमुक्त विभागाचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड यांच्या गेल्या दहा वर्षांपासून सुरु असलेल्या शासनाकडील पाठपुराव्याला यश मिळाले. यासंदर्भात शासनाने जिल्हाधिकारी दौंडचे तहसीलदार, उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांना सूचना केल्या आहेत. दरम्यान, या निर्णयामुळे सोनवडी गावातील बंजारा तांड्यावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सोनवडी गावातील सेवालालनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर बंजारा समाज राहतो. तेव्हा सेवालालनगरची स्वतंत्र ग्रामपंचायत आणि स्वतंत्र व्यवस्था असावी, म्हणून हिरालाल राठोड यांनी सातत्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला. बंजारा समाजाचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दर्जा उंचवावा यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत होणे गरजेचे होते. त्यानुसार सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होते. याकामी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकार्य मिळाले असल्याचे राठोड यांनी सांगितले. ------------------