वालचंदनगर परिसरासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:37+5:302015-08-26T23:32:37+5:30
वालचंदनगर : वालचंदनगरसह परिसरातील चिखली, रणगाव, कळंब, भोरकरवाडी, रत्नपुरी, लालपुरी, परिटवाडी आदी भागांतील नागरिकांच्या जोरदार मागणी, पाठपुरावा, प्रयत्नामुळे ३३/११ के. व्ही. उपकेंद्र उभारणीस मान्यता मिळाली. त्या उपकेंद्र निर्मितीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती खंडकरी शेतकरी कृती समितीचे सदस्य हर्षवर्धन गायकवाड यांनी दिली

वालचंदनगर परिसरासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र
व लचंदनगर : वालचंदनगरसह परिसरातील चिखली, रणगाव, कळंब, भोरकरवाडी, रत्नपुरी, लालपुरी, परिटवाडी आदी भागांतील नागरिकांच्या जोरदार मागणी, पाठपुरावा, प्रयत्नामुळे ३३/११ के. व्ही. उपकेंद्र उभारणीस मान्यता मिळाली. त्या उपकेंद्र निर्मितीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती खंडकरी शेतकरी कृती समितीचे सदस्य हर्षवर्धन गायकवाड यांनी दिली या संदर्भात बारामती वितरण परिमंडलाचे मुख्य अभियंता रामराम मुंडे यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक झाली. या परिसरात विहिरी, नदीवरील उपसा सिंचन योजना व अन्य काही जलसाठ्यातील पाणी शेतीसाठी वापरण्यास विजेची खूपच गरज भासते. त्यातच महाराष्ट्र राज्य शेतीमहामंडळाकडील शेतजमीन रत्नपुरी मळ्यांतर्गत असलेल्या खंडकरी शेतकर्यांना वारसाहक्काने परत मिळाल्या आहेत. यामुळे भविष्यात या भागातील खंडकरी शेतकर्यांच्या जमिनी ओलिताखाली येणार आहेत. त्यासाठी विजेची मागणी दिवसेंदिवस वाढती राहणार आहे. सध्या जंक्शन येथील फिडरवरून वालचंदनगर, कळंब, चिखली, रणगांव, अंथुर्णे, लासुर्णे आदी गावांना विद्युत पुरवठा केला जातो. त्यामुळे तांत्रिक कारणाने वीजप्रवाह खंडित होऊन कमालीच्या विद्युत भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिसरातील कळंब येथे ३३/११ केव्ही उपकेंद्र उभारणीची या परिसरातील असंख्य कामगार, शेतकरी, विद्यार्थी व अन्य लोकांनी मागणी केली होती. अखेर मागणीस यश आले आहे. उपकेंद्रासाठी सुमारे अडीच एकर जागा घेतली आहे. त्या जागेच्या कब्जा हक्काची रक्कम संबंधितांकडे भरली आहे. या जागेचा हस्तांतरण प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. प्रस्ताव मंजुरीनंतर प्रत्यक्षात उपकेंद्र उभारणीस युद्धपातळीवर सुरुवात होईल, असे मुंडे व गायकवाड यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शेतकर्यांसह विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक यांचे नुकसान होणार नाही. या बैठकीस बारामती विभागाचे कार्यकारी अभियंता मधुकर घुमे, स्थापत्य व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता घुमे, उपअभियंता गोफणे, खंडकरी प्रतिनिधी हर्षवर्धन गायकवाड, ॲड. पांडुरंग गायकवाड, बाळासाहेब डोंबाळे, सुहास वाघ उपस्थित होते.