सायकल, बैलगाडीतून विश्व पाहणाऱ्या 'इस्त्रो'ची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 01:42 PM2018-08-15T13:42:50+5:302018-08-15T14:38:19+5:30

1960 साली स्थापन झालेल्या 'इस्त्रो'ने प्रचंड संघर्ष केला

Independence Day: The story of 'Istro' who dreamed of sending Indian Indians to the space of 2022 | सायकल, बैलगाडीतून विश्व पाहणाऱ्या 'इस्त्रो'ची गोष्ट

सायकल, बैलगाडीतून विश्व पाहणाऱ्या 'इस्त्रो'ची गोष्ट

Next

नवी दिल्ली : देशाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी यांनी 2022 पर्यंत अंतराळामध्ये भारतीयाला पाठविण्याची घोषणा केली. भविष्यात हे शक्य झाल्यास भारताच्या शिरपेचात मानाचे तुरे खोवणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन केंद्रासाठी  (ISRO) हे एक मोठे यश असणार आहे. कारण, इस्त्रोने हा टप्पा गाठण्यासाठी प्रचंड संघर्ष केला आहे. 


इस्त्रोने पहिला उपग्रह पाठविण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. एकेकाळी उपग्रह आणि त्याला अवकाशात पाठविण्यासाठी लागणाऱ्या रॉकेटचे सुटे भाग इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी बैलगाड्या आणि सायकलींवरून वाहून नेले होते. इस्त्रोची स्थापना 1960 मध्ये झाली होती. अमेरिकेमध्येही अंतराळात उपग्रह पाठविण्याचे प्रयोग प्राथमिक अवस्थेत होते. अमेरिकेने प्रशांत महासागरात खेळले गेलेल्या टोकिआे ऑलिंपिक खेळांचे थेट प्रसारण केल्यामुळे जगभराचे लक्ष वेधले गेले होते. 


 अमेरिकेच्या सिनकॉम-3 या उपग्रहाने ही किमया साधली होती. यावर प्रभावित होऊन भारताचे अंतराळ मोहिमेचे जनक शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांनी उपग्रहाचे महत्व ओळखले. यानंतर 16 फेब्रुवारी, 1962 ला अणुऊर्जा विभागाने अंतराळ संशोधन राष्ट्रीय समितीची स्थापना केली. यानंतर तुंबा भूमध्य रॉकेट लाँचिंग केंद्राचे काम करायला सुरुवात झाली. 

1963 मध्ये पहिले रॉकेट लाँच
यानंतर साधारण वर्षभरातच भारताने आपले पहिलेवहिले रॉकेट लाँच केले. तिरुवनंतपुरम जवळ तुंबा येथे हे केंद्र होते. येथील एका चर्चच्या बाजुलाच असलेल्या फादरच्या घरात कार्यालय बनविण्य़ात आले. तसेच चर्चच्या इमारतीत नियंत्रण कक्ष उघडण्यात आला. 21 नोव्हेंबर, 1963 मध्ये तुंबा येथून सोडलेल्या रॉकेटचे निरीक्षण उघड्या डोळ्यांनी म्हणजेच दुर्बिनीशिवाय केले गेले. रॉकेटमधून निघणाऱ्या धुराद्वारे या रॉकेटचे ट्रॅकिंग केले गेले. यापुर्वी रॉकेटचे सुटे भाग बैलगाडी, सायकलच्या साह्याने लाँच पॅडपर्यंत पोहोचविण्यात आले होते. 

12 वर्षांनी पहिला उपग्रह झेपावला
या दरम्यान बरेच प्रयोग केले गेले. शेवटी एका तपानंतर रशियन रॉकेटच्या सहाय्याने 19 एप्रिल, 1975 ला भारताचा पहिला उपग्रह 'आर्यभट्ट' अंतराळात झेपावला. यावेळीही इस्त्रोकडे मुलभूत सुविधाही नव्हत्या. बेंगळुरुमध्ये यावेळी स्वच्छतागृहाचे रुपांतर वेळ दाखविणाऱ्या केंद्रामध्ये केले गेले होते. आज आपला देश दुसऱ्या देशांच्या उपग्रहांचे निर्माण करण्याबरोबरच त्यांचे प्रक्षेपणही करतो. एवढी मजल गाठण्यासाठी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना अनंत समस्यांचा सामना करावा लागला होता. 


यानंतर इस्त्रोने कधीही मागे वळून पाहिले नाही. 1980 मध्ये पहिल्या स्वदेशी सॅटेलाईट व्हेईकल एसएलव्ही-3 द्वारे रोहिणी उपग्रहाला कक्षेत सोडण्यात आले. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून हा उपग्रह सोडण्यात आला होता. यानंतर भारत अंतराळामध्ये दबदबा असणाऱ्या सहा देशांच्या यादीत विराजमान झाला. 


ऑक्टोबर 2008 मध्ये चंद्रयान मोहिमेने तर इस्त्रोला चार चाँद लावले. चांद्रयान-1 ये यान 2009 पर्यंत कार्यरत होते. महत्वाचे म्हणजे या मोहिमेची घोषणा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 2003 सालच्या स्वातंत्र्य दिनादिवशीच केली होती. इस्त्रो यंदा चांद्रयान-2 ला पाठविण्याची तयारी करत आहे.

मंगळयान मोहिमेने उडविली जगाची झोप
इस्त्रोच्या मंगळयान मोहिमेने 2013 मध्ये भल्याभल्या शक्तींची झोप उडवली. आशियातून मंगळावर पाऊल ठेवणारी इस्त्रो ही एकमेव. शेजारच्या प्रतिस्पर्धी चीनलाही अद्याप मंगळवारी जमलेली नाही. हे यान 24 सप्टेंबर, 2014 ला मंगळावर यशस्वीरित्या पोहोचले.
 

Web Title: Independence Day: The story of 'Istro' who dreamed of sending Indian Indians to the space of 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.