शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Independence Day: भारताचे तीन तुकडे करणाऱ्या रॅडक्लिफ लाइनबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 14:21 IST

भारत आणि पाकिस्तान असे दोन देश फाळणीनंतर तयार झाले, भारताच्या पूर्वेस पूर्व पाकिस्तान व पश्चिमेस पश्चिम पाकिस्तान तयार झाला.

मुंबई- 1947 साली भारताची फाळणी झाली आणि भारतपाकिस्तान असे दोन देश निर्माण झाले एवढे आपल्याला माहिती असते. मात्र या फाळणीमुळे भारताचे कसे तुकडे पडले, कोणी ते पाडले, कसे पाडले याबद्दल फारशी माहिती नसते. आज भारतीय उपखंडाची राजकीय स्थिती पाहिली की भारताची फाळणी अत्यंत घाई-घाईत करण्यात आल्याचे दिसून येते. त्याचे परिणाम आजही दोन्ही देश भोगत आहेत. 

17 ऑगस्ट 1947 रोजी दोन्ही देशांमध्ये रॅडक्लिफ लाइन आखून दोन वेगळे देश निर्माण करण्यात आले. सर सिरील रॅडक्लिफ यांनी भारत व पाकिस्तान यांच्यामधील सीमारेषा निश्चित केली. ते सीमा आयोगाचे अध्यक्ष होते. त्यांनी आखलेल्या रेषेमुळे पश्चिम पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान आणि भारत असे तीन भाग करण्यात आले. नंतर पश्चिम पाकिस्तानच्या जुलमी राजवटीला आणि अत्याचारांना कंटाळून पूर्व पाकिस्तानने लढा देऊन 1971 साली स्वतंत्र बांगलादेश मिळवला. 

रॅडक्लिफ यांनी फाळणीची रेषा आखण्यासाठी भारतात येण्यापूर्वी कधीही भारत पाहिलेला नव्हता. येथील सामाजिक घटकांची त्यांना काहीही माहिती नव्हती. भारताच्या समाजरचनेचा, भौगोलिक स्थितीचा, लोकसंख्येचा कोणताही अभ्यास त्यांनी केला नव्हता. इंग्लंडमधील एक उत्तम वकील म्हणून ते ओळखले जात. त्यांचा जन्म 30 मार्च 1899 रोजी वेल्स या प्रांतात झाला. भारताची फाळणीरेषा आखल्याबद्दल त्यांना लॉ लॉर्ड आणि नाइट ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर या सन्मानाने गौरविण्यात आले होते.

 8 जुलै 1947 साली ते पहिल्यांदा भारतात आले. रॅडक्लिफ यांना अशी घाई-गडबडीत सीमारेषा आखण्याची कल्पना आवडलेली नव्हती. त्यामध्ये अनेक त्रूटी असल्याचे त्यांनी मान्य केले होते. मात्र तत्कालीन परिस्थितीत काम पूर्ण करण्यापलिकडे त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. रॅडक्लिफ यांनी रेषा आखल्यापोटी सरकारने देऊ केलेली 3000 पौंडाची रक्कमही नाकारल्याचे सांगण्यात येते. आपल्या फाळणीरेषेची अंमलबजावणी होण्यापूर्वीच रॅडक्लिफ यांनी भारत सोडून इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला आणि 15 ऑगस्ट रोजीच ते निघून गेले. 16 ऑगस्ट रोजी फाळणीच्या रेषेचा अहवाल वाचण्यासाठी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींना केवळ दोन तास देण्यात आले आणि 

 तर लाहोर भारतात आले असते-रॅडक्लिफ यांना लाहोर शहर भारतामध्ये देण्याची इच्छा होती. मात्र तसे करण्याने पाकिस्तानला कोणतेही मोठे शहर मिळाले नसते. भारताच्या वाट्याला कोलकाता शहर गेल्यामुळे त्यांनी लाहोर शहर पाकिस्तानच्या बाजूला देण्याचे निश्चित केले.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसIndiaभारतPakistanपाकिस्तान