PM Narendra Modi Addressed From Red Fort On Independence Day 205: भारताने निश्चय केला आहे की, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. सिंधू जलकारक अन्यायकारक आणि किती एकाच बाजूचा विचार करून केलेला होता, हे संपूर्ण देशवासीयांना समजले आहे. भारतातून वाहत असलेल्या नद्यांचे पाणी शत्रूंची शेती समृद्ध करत आहेत आणि माझ्या देशातील शेतकरी आणि शेतजमीन पाण्यासाठी व्याकूळ होत आहेत. या जलकरारामुळे गेल्या ७० दशकांपासून भारतातील शेतकऱ्यांचे अकल्पनीय नुकसान झाले, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सुनावले. स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. तत्पूर्वी, एक्सवर पोस्ट करून देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिला.
देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून देशातील काही भागांत नैसर्गिक आपत्ती, भूस्खलन, ढगफुटी, तसेच अनेक आपत्तींना तोंड देत आहोत. बाधित लोकांबद्दल संपूर्ण देशाच्या सहवेदना आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकार बचाव कार्य, मदत कार्य आणि पुनर्वसन कार्यात पूर्ण ताकदीने एकत्र काम करत आहेत. लाल किल्ल्यावरून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या शूर सैनिकांना अभिवादन करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या शूरवीर सैनिकांनी शत्रूला त्यांनी कल्पनाही केली नसेल, अशी शिक्षा दिली आहे.
पाकिस्तानमध्ये विध्वंस इतका प्रचंड आहे की....
संपूर्ण भारतात संताप होता आणि पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरले होते. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही त्या संतापाची अभिव्यक्ती आहे. पाकिस्तानमध्ये विध्वंस इतका प्रचंड आहे की दररोज नवीन खुलासे होत आहेत आणि दररोज नवीन माहिती बाहेर येत आहे. २२ एप्रिल रोजी सीमेपलीकडून दहशतवादी पहलगाममध्ये आले. त्यांचा धर्म विचारून लोकांना मारले. २२ तारखेनंतर भारताच्या सशस्त्र दलांना आम्ही पूर्ण स्वातंत्र्य दिले. तेच रणनीती, लक्ष्य आणि वेळ ठरवतात. आमच्या सैन्याने असे करून दाखवले आहे की, जे अनेक दशकांपासून कधीही केले नव्हते. आम्ही शत्रूच्या भूमीत शेकडो किलोमीटर घुसून त्यांचे दहशतवादी मुख्यालय उद्ध्वस्त केले.
दरम्यान, भारत प्रत्येक क्षेत्रात एक आधुनिक इकोसिस्टिम निर्माण करत आहे. तरुणांना आणि सरकारच्या प्रत्येक विभागाला आवाहन करतो की, आपण आपल्या लढाऊ विमानांसाठी मेड-इन-इंडिया जेट इंजिन तयार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्याला जगाची फार्मसी म्हणून ओळखले जाते, परंतु संशोधन आणि विकासात अधिक गुंतवणूक करणे ही काळाची गरज नाही का? मानवतेच्या कल्याणासाठी सर्वोत्तम आणि परवडणारी औषधे आपणच पुरवणारे असू नये का? असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केले.