शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीसाठी थांबवलं म्हणून कार चालकानं थेट पोलीस कर्मचाऱ्याला उडवलं!, पाहा अंगावर काटा आणणारा Video...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 20:38 IST

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एक पोलीस कर्मचारी चेक पोस्टवर वाहन चालकांची चौकशी करत असताना एका कार चालकानं तपासासाठी नकार देत थेट पोलीस कर्मचाऱ्यावर गाडी चढवल्याचा भयानक प्रकार घडला आहे. यात पोलीस कर्मचारी जबर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पंजाबच्या पटियाला शहरात ही घटना घडली आहे. पटियालामध्ये वाहनांच्या चौकशी दरम्यान एका कार चालकानं पोलीस कर्मचाऱ्यावरच कार चढवली आणि घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी संबंधित कार चालकाचा शोध लावला असून प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

कार चालकाची चौकशी करण्यासाठी कार थांबविण्याचा पोलीस कर्मचारी प्रयत्न करत असताना चालकानं कार थांबविण्यास नकार दिल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. यात कार चालकानं पोलीस कर्मचाऱ्याला अक्षरश: उडवलं आहे आणि काही मीटर अंतरावर त्याला फरफटत नेण्याचा प्रकार घडला आहे. काही अंतरावर गेल्यानंतर पोलीस कर्मचारी गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला. आरोपी कार चालकानं कोणतीही माणूसकी न दाखवता घटनास्थळावरुन पोबारा केल्याचं व्हिडिओत दिसून येतं. 

टॅग्स :PunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारी