शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
2
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
3
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
4
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
5
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
6
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
7
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
8
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
9
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
10
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
11
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
12
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
13
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
14
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
15
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
16
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
17
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
18
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
19
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
20
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत

Independence Day 2021 : मी शेकडो अनावश्यक कायदे रद्द केले : पंतप्रधान नरेंद्र माेदी; ७५वा स्वातंत्र्यदिन देशभर उत्साहात साजरा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 06:11 IST

Independence Day 2021 : ‘सर्जिकल आणि हवाई हल्ले करून भारताने शत्रूंना इशारा दिला आहे की, ' हम किसी से कम नहीं'. ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मोदींनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित केले. त्यांनी ८८ मिनिटांचे भाषण दिले.

- विकास झाडे

नवी दिल्ली : जे जुने अनावश्यक कायदे होते, ते आधीच्या सरकारला रद्द करण्यात जराही रस नव्हता. मी मात्र असे शेकडो कायदे रद्द केलेत, याकडे लक्ष वेधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास यांना 'सबका प्रयास' ची जोड दिली. ‘सर्जिकल आणि हवाई हल्ले करून भारताने शत्रूंना इशारा दिला आहे की, ' हम किसी से कम नहीं'.७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मोदींनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित केले. त्यांनी ८८ मिनिटांचे भाषण दिले.

ते म्हणाले, 'हीच योग्य वेळ आहे, ही भारतासाठी मौल्यवान वेळ आहे.  आपल्याकडे शक्ती आहे, उठा आणि तिरंगा लहरवा'. सर्वांच्या क्षमतेला योग्य संधी देणे, हीच लोकशाहीची खरी भावना आहे.  आज सरकारी योजनांची गती वाढली आहे. आपण निर्धारित लक्ष्य साध्य करत आहोत. आता आपल्याला पूर्णत्वाकडे जायचे आहे. त्यासाठी आम्हाला आता सुरुवात करावी लागेल. आमच्याकडे गमावण्यासाठी एकही क्षण नाही. ही योग्य वेळ. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास, याच श्रद्धेने आपण सगळे जमलो आहोत.

सुरक्षेचा उपाय म्हणून लाल किल्ल्याच्या आजूबाजूला शिपिंग कंटेनरच्या इमारती उभारण्यात आल्या होत्या. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य ड्रोनहल्ला लक्षात घेता या शिपिंग कंटेनरच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. दिल्लीमध्ये नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. गणतंत्रदिनी शेतकरी आणि पोलिसांमध्ये जी हिंसा झाली, त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सुरक्षेचा उपाय म्हणून लाल किल्ल्याकडे जाणा-या रस्त्यांवर शिपिंग कंटेनरच्या भिंती उभारल्याचे सांगण्यात आले. 

१०० लाख कोटींची योजना!मोदी यांनी 'प्रधानमंत्री गति-शक्ति-योजने'ची घोषणा केली. या योजनेचे पॅकेज १०० लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक असणार आहे. यामुळे लाखो लोकांना रोजगार दिला जाईल, असा त्यांना विश्वास आहे. पायाभूत सुविधा आणि दळणवळणासाठी ही योजना खास असेल. सामान्य माणसांच्या प्रवासाचा वेळ वाचेल. त्यामुळे लोकांची आणि उद्योगांची कार्यक्षमता वाढेल. या सगळ्यामुळे भारतीय उद्योजकांना जागतिक पातळीवरील स्पर्धेत उतरता येईल.

खेळाडूूंसाठी टाळ्यांचा वर्षाव!मोदींनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय तुकड्यांची भेट घेतली. मोदींनी त्यांचा विशेष उल्लेख करून त्यांच्यासाठी टाळ्यांचा गजर करा, असे आवाहन केले. प्रथमच कार्यक्रमस्थळी हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव करण्यात आला.

काश्मिरात विकासाचा समतोल!जम्मू असो किंवा काश्मीर तिथे आता विकासाचा समतोल दिसत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये निर्बंध आयोगाची स्थापना करण्यात आली आहे आणि भविष्यातील विधानसभा निवडणुकांचीही तयारी सुरू आहे.

पंडित नेहरूंचा उल्लेख! मोदी हे त्यांच्या भाषणातून नेहमी पंडित नेहरूंना टाळतात, तर सरदार पटेलांचा उल्लेख करतात. परंतु आज त्यांनी महात्मा गांधी, सरदार पटेल, भगतसिंग यासोबतच पंडित नेहरूंच्या नावाचाही उल्लेख केला.  ते म्हणाले, स्वातंत्र्याच्या आंदोलनात सर्वस्व त्यागणारे सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, बिस्मिल अश्फाक उल्लाह खान, राणी लक्ष्मीबाई, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांचे देश आज स्मरण करतो आहे. आम्ही सगळे त्यांचे कर्जदार आहोत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndependence Dayस्वातंत्र्य दिन