स्वातंत्र्य दिन
By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:14+5:302015-08-18T21:37:14+5:30
सेंट लॉरेन्स हायस्कूल

स्वातंत्र्य दिन
स ंट लॉरेन्स हायस्कूलसिडको : येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल व्ही. जे. दत्ता उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थी वाद्यवृंद गटाने व उपस्थितांनी राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली.अल्पसंख्याक सेलनाशिक : नाशिक शहर व जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेसच्या वतीने कथाडा येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी शरद अहेर यांनी ध्वजवंदन करून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. यावेळी सुमन नाईक मनपा शाळा, कथडा या शाळेचे शिक्षकवृंद व विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी समूहगीत म्हटले. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी शरद अहेर, हनिफ बशीर शेख, शोभा बच्छाव, वत्सला खैरे, हेमलता पाटील, शाहू खैरे, जावेद इब्राहिम, राजेंद्र बागुल, लक्ष्मण मंडाले, माजी खासदार डॉ. प्रतापराव वाघ आदि उपस्थित होते. फ्रावशी अकॅडमीनाशिक : संस्थेचे अध्यक्ष रतन लथ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, पालक व शाळेच्या बँड पथकाने ध्वजास मानवंदना देऊन राष्ट्रगीत म्हटले. महात्मा गांधी प्राथमिक विद्यामंदिरनाशिक : जनता सेवा मंडळ संचलित महात्मा गांधी प्राथमिक विद्यामंदिर व पंचवटी माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गं. पां. माने, संचालक सुनंदा माने, ॲड. सुरेश आव्हाड, ॲड. अमोल घुगे, परिसरातील मान्यवर, पालक, नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक आव्हाड यांनी केले. मुख्याध्यापक जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.के.बी.एच. हायस्कूल गिरणारेनाशिक : मराठा विद्या प्रसारक समाजाचे के.बी.एच. हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय गिरणारे येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. शालेय माध्यमिक समितीचे अध्यक्ष निवृत्ती पाटील घुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. माध्यमिक समितीचे अध्यक्ष माधवराव पाटील थेटे यांच्या हस्ते स्काउटचे ध्वजारोहण झाले. प्रास्ताविक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुनीता पाटील यांनी केले. व्यासपीठावर पुंडलिक थेटे, विजू थेटे, श्यामराव गायकर, रतन थेटे, साहेबराव थेटे, नामदेव गायकर, तानाजी थेटे, भारत ढिकले, अविनाश पाटील, श्याम थेटे, सरपंच दौलत निंबेकर, उपसरपंच मिलिंद थेटे, गिरणारे केंद्राचे केंद्रप्रमुख कोठावदे उपस्थित होते. सूत्रसंचालन वैशाली पवार, सुरेखा पवार यांनी केले, तर चंद्रकांत पवार यांनी आभार मानले.न्यू ईरा इंग्लिश स्कूलनाशिक : न्यू ईरा इंग्रजी शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रशासकीय अधिकारी उमेश डोंगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी नाटक, नृत्य, गाणी यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी एकजुटीची भावना, सांस्कृतिक विविधता, देशभक्ती आणि सामाजिक जाणिवा याविषयीचा संदेश दिला. मनपा शाळा क्र. ६६नाशिक : जैन सोशल ग्रुप सेंट्रलतर्फे मनपा शाळा क्र. ६६ मोटकरवाडी येथे सुभाष भंडारी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमास नगरसेवक सुनीता मोटकरी, सुजाता डेरे उपस्थित होते. जेएसजी सेंट्रलतर्फे विद्यार्थ्यांना ज्ञानवृद्धीसाठी पुस्तकांचे वाटप करण्यात आले.