उच्चभ्रू वस्तीत ५ लाखांची घरफोडी जळगावातील श्रद्धा कॉलनीतील घटना : १५ तोळे सोने, चांदी भांडी, दागिने लंपास
By Admin | Updated: February 19, 2016 00:23 IST2016-02-19T00:23:45+5:302016-02-19T00:23:45+5:30
सेंट्रल डेस्क व मुख्य १ साठी

उच्चभ्रू वस्तीत ५ लाखांची घरफोडी जळगावातील श्रद्धा कॉलनीतील घटना : १५ तोळे सोने, चांदी भांडी, दागिने लंपास
स ंट्रल डेस्क व मुख्य १ साठीजळगाव : अत्यंत सुरक्षित व उच्चभ्रू लोकांची वस्ती म्हणून ओळख असलेल्या श्रध्दा कॉलनीत सविता अशोक भावसार (वय ५२) या शिक्षिका मुलाच्या उपचारासाठी पुणे येथेगेलेल्याअसल्याचीसंधीसाधतचोरट्यांनी बंद घराचे कुलूप व कडी-कोयंडा तोडून पंधरा तोळे सोने, चांदीची भांडी, दागिने व रोख दहा हजार असा ५लाखाच्या वर मुद्देमाल लांबविल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. याच घराच्या काही अंतरावर असलेल्या अपार्टमेंटमधून दुचाकीही चोरट्यांनी लांबवली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविता भावसार या सोमवारी रात्री आठ वाजता मेंदुच्या आजाराबाबत उपचारासाठी मुलगा हिमांशू याला पुण्याला घेवून गेल्या होत्या. तेथून गुरुवारी सकाळी साडे सहा वाजता घरी आल्या असता घराच्या दरवाजाची कडी व कोयंडा तुटलेला दिसला.