सेवा करात घसघशीत वाढ

By Admin | Updated: July 11, 2014 02:47 IST2014-07-11T02:47:29+5:302014-07-11T02:47:29+5:30

अल्प मुदतीत अर्थसंकल्प बनविताना नवीन मोदी सरकारला फार दमछाक करावी लागली; तसेच अर्थमंत्र्यांचीही ते सादर करताना दमछाक झाली.

Increasing service tax slowdown | सेवा करात घसघशीत वाढ

सेवा करात घसघशीत वाढ

उमेश शर्मा
अल्प मुदतीत अर्थसंकल्प बनविताना नवीन मोदी सरकारला फार दमछाक करावी लागली; तसेच अर्थमंत्र्यांचीही ते सादर करताना दमछाक झाली. इनडायरेक्ट टॅक्स संबंधित काही प्रमुख बदलांची खालीलप्रमाणो माहिती दिली आहे. परंतु अनेक लहानसहान पैलू पुढे सविस्तरपणो अर्थसंकल्पाचा अभ्यास केल्यास येतीलच. इनडायरेक्ट टॅक्समध्ये तरतुदीचा डायरेक्ट व इनडायरेक्टली होणारा परिणाम फार व्यापक आहे. काही चांगले, काही जाचक बदल सव्र्हिस टॅक्स व एक्साईजमध्ये आलेले आहेत. जीएसटी म्हणजेच गुड्स अॅण्ड सव्र्हिस टॅक्स लागू करण्यासंबंधी कोणतेही वेळेचे बंधन जाहीर केलेले नाही. हे होणो गरजेचे होते. अशाने व्यापारी वर्ग कामाला लागला असता व ते लागू करण्यासाठी शासनालाही बंधन आले असते.
 
सव्र्हिस टॅक्समधील बदल
 सव्र्हिस टॅक्समध्ये टॅक्सीवर टॅक्स लावायचे प्रस्तावित केले आहे. म्हणजेच लोकल रेडिओ टॅक्सीचा प्रवास महागडा होणार आहे. त्याची अंमलबजावणी करणो अडचणीचे होऊ शकते. कारण अधिकृत वा अनधिकृत टॅक्सचे प्रमाण व असंघटित क्षेत्र असल्याने त्यावर नियंत्रण ठेवणो अवघड होऊ शकते.
 
एसी बसवरील सव्र्हिस टॅक्सला दिलेली सूट कमी केलेली आहे. त्यामुळे प्रवास खर्च वाढेल. कापूस वा कापसाच्या गाठीवर व इतर संबंधित ट्रान्सपोर्टवर जीटीएमध्ये सूट देण्याचे प्रस्तावित केले आहे. ते लगेच लागू होईल. यामुळे जिनिंग-प्रेसिंगवाल्यांना फायदा होईल.
 
ईएसआयसी कॉर्पोरेशनतर्फे देण्यात आलेल्या सेवांना जून 2क्12पासून सूट लागू केली आहे. फूल रिव्हर्स चार्जचे क्रेडिट घेण्यासाठी बिलाची रक्कम अदा करण्याची आता गरज नाही.
 
हॉस्पिटल, बायोमेडिकल वेस्ट गोळा करणो व ट्रिटमेंट देणा:या सव्र्हिसला सूट देण्यात आली आहे. परदेशात प्रवास करताना भारतीय टूर ऑपरेटर्सनी सेवेवर दिलेल्या सव्र्हिस टॅक्सला सूट दिली आहे. त्यामुळे परदेशी यात्र फायदेशीर होईल.
 
व्याजाचे दर सव्र्हिस टॅक्समध्ये आता ऑक्टोबर 2क्14 फारच जाचक होणार आहेत. जसे सहा महिने उशीर झाल्यास 18 टक्के व्याज, 6 महिने ते 1 वर्षर्पयत उशीर झाल्यास 24 टक्के, 1 वर्षाच्या पुढे उशीर झाल्यास 3क् टक्के व्याज दरवर्षी भरावे लागेल. सव्र्हिस टॅक्स उशिरा भरल्यास सावकारी पद्धतीने व्याज गोळा केले जाणार आहे. प्रत्येक करदात्यास हे भरावे लागेल. अशी तरतूद आजर्पयत कोणत्याही कायद्यात आलेली नाही.
इनपूट सव्र्हिस टॅक्सचे क्रेडिट घेण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी प्रस्तावित केला आहे. बिलाच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत किंवा बिलाची रक्कम अदा करताना यापैकी जे आधी होईल तेव्हापासून रिव्हर्स चार्ज लागू होईल. 
नवीन एक्साईज रूलच्या हिशेबाने सव्र्हिस टॅक्समध्ये अपील करण्यापूर्वी डिपॉङिाट रक्कम 7.5 टक्के, 1क् टक्के इत्यादी नियम लागू केले आहेत. अशाने अपिलाचा खर्च वाढणार आहे.
 
एक्साईजमधील बदल
एक्साईज डिपार्टमेंट आता माहिती गोळा करण्यासाठी इतर विभागांना म्हणजेच इन्कम टॅक्स, व्हॅट, कंपनी लॉ, विद्युत विभाग इत्यादींना विशिष्ट रिटर्नद्वारे मागवलेली माहिती देणो गरजेचे होईल. अशाने माहितीची देवाण-घेवाण वाढेल व करचुकवेगिरीला आळा बसेल.
 
सिगरेटवरील एक्साईज डय़ुटी 11वरून 72 टक्क्यांर्पयत वाढविले आहे. तसेच पानमसाला 4}, जर्दा इत्यादीवर 1क्} वाढ केली आहे.
 
खाद्यपदार्थासाठी लागणा:या मशिनरींच्या एक्साईज डय़ुटीचा दर 4 टक्क्याने कमी करण्याचे प्रस्तावित केले आहे.
 
एलईडी लाईट्समध्ये वापरण्यात येणा:या यंत्रंचे दर 1क् ते 12 टक्क्यांवरून 6} कमी केले.
 
सोलार ग्लासला सूट देण्यात आली आहे. यामुळे सोलार एनर्जी व बनविलेली यंत्रे स्वस्त होतील.
 
5क्क् ते 1क्क्क् रुपयांर्पयतच्या चप्पल व बुटांवरील दर 12 टक्क्यांवरून 6} कमी केला आहे. 5क्क् रुपयांखालील दर माफ राहतील.
 
पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणा:या आरो मशीन्सवर एक्साईज डय़ुटीचा दर 1क् ते 12 टक्क्यांवरून 6} कमी केला आहे.
 
 खेळताना वापर केला जाणा:या हातमोज्यांचा दर कमी करण्यात आला आहे. 
थंड पाण्यात साखर मिसळून बनविलेल्या पेयांवर 5} अधिक दर प्रस्तावित केला.
 

 

Web Title: Increasing service tax slowdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.