मंत्रिमंडळ पुनर्रचनेसाठी काँग्रेसचा वाढता दबाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 10:51 AM2021-07-01T10:51:20+5:302021-07-01T10:51:49+5:30

कामगिरीच्या आधारे मूल्यमापनाची भूमिका

Increasing pressure from Congress to reshuffle the cabinet | मंत्रिमंडळ पुनर्रचनेसाठी काँग्रेसचा वाढता दबाव

मंत्रिमंडळ पुनर्रचनेसाठी काँग्रेसचा वाढता दबाव

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची नोव्हेंबर, २०१९ मध्ये शपथ घेतली होती. या तीन पक्षांच्या नेत्यांना मंत्र्यांच्या कामगिरीच्या आधारावर आणि सरकारमध्ये आणखी उर्जा आणि प्रतिभा यावी वाटते म्हणून मंत्रिमंडळ पुनर्रचना आवश्यक वाटत आहे

व्यंकटेश केसरी

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदी आपला उमेदवार निवडून आला पाहिजे, अशी भूमिका असलेला काँग्रेस पक्ष राज्य मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेसाठी आणखी दबाब निर्माण करीत आहे. अधिवेशनानंतर उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची पुनर्रचना झाली पाहिजे, असे त्याला हवे आहे. या भूमिकेचे संकेत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिले. राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीत काँग्रेस हा महत्वाचा भागीदार आहे. “हे काम शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षातील नेत्यांशी विचारविनिमय करून केले जाईल. या पक्षांचे वरिष्ठ नेते विधिमंडळाच्या या अधिवेशनानंतर एकत्र बसून विषयावर चर्चा करतील,” असे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचा भाग असलेल्या काँग्रेस नेत्याने म्हटले. 

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची नोव्हेंबर, २०१९ मध्ये शपथ घेतली होती. या तीन पक्षांच्या नेत्यांना मंत्र्यांच्या कामगिरीच्या आधारावर आणि सरकारमध्ये आणखी उर्जा आणि प्रतिभा यावी वाटते म्हणून मंत्रिमंडळ पुनर्रचना आवश्यक वाटत आहे. ठाकरे सरकार अस्थिर आहे हा विरोधकांकडून होणारा प्रचारही या पुनर्रचनेमुळे निकाली काढता येईल, अशीही यामागे भूमिका आहे. याशिवाय, पुनर्रचनेमुळे महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांना विश्वास दिला जाऊ शकेल कारण ठाकरे सरकार त्याची मुदत पूर्ण करील, असे ते म्हणाले आहेत, असे हा नेता म्हणाला.
भाजपकडून गेले काही दिवस सरकारबाबत अपप्रचार सुरु आहे. सत्ताधारी आघाडीतील मतभेद आणि आपापसांतील दबाबामुळे हे सरकार फार दिवस टिकणार नाही असा समज झालेल्या नोकरशाहीतील एका गटालाही याद्वारे स्पष्ट संदेश जाईल. शिवसेना आमदारांतील एक गट अजूनही पक्षाने भाजपसोबतच असले पाहिजे, असे वाटणारा आहे.

नाव ठरलेले नाही
n काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी कोणाचेही नाव निश्चित केलेले नाही, असे स्पष्ट केले आहे. 
n अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर झाली की, नाव महाराष्ट्र काँग्रेसला आणि त्याच्या विधिमंडळ पक्षाला कळवले जाईल. 
n हे नाव राज्य मंत्रिमंडळातील किंवा मंत्री नसलेलेही असू शकेल.
 

Web Title: Increasing pressure from Congress to reshuffle the cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.